हा तर अमेरिकेविरोधातील बंड, २४४ वर्षांच्या इतिहासाला बट्टा, बायडेन यांची जहरी टीका

एकीकडे कोरोना संकटाशी देश सामना करत असताना दुसरीकडे अशा लोकशाहीविरोधी घटना घडत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केलीय. सिनेटमधील सदस्य देशाच्या भवितव्याचा विचार करून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोग खटल्याच्या बाजूने मतदान करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.

गेल्या आठवड्यात अमेरिकेनं पाहिलेला हिंसाचार हा अभूतपूर्व आणि लज्जास्पद होता, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे आगामी अध्यक्ष जो बायडेन यांनी दिलीय. अमेरिकेच्या २४४ वर्षांच्या इतिहासाला बट्टा लावणारी ही घटना होती, असा हल्लाबोल त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर केलाय.

एकीकडे कोरोना संकटाशी देश सामना करत असताना दुसरीकडे अशा लोकशाहीविरोधी घटना घडत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केलीय. सिनेटमधील सदस्य देशाच्या भवितव्याचा विचार करून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोग खटल्याच्या बाजूने मतदान करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.

प्रतिनिधी गृहावर झालेला हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोपही बायडेन यांनी केलाय. राजकीय अतिरेकी आणि टोकाची विचारधारा बाळगणाऱ्या समूहाकडून हे कृत्य केल्याचं त्यांनी म्हटलंय. हा अमेरिकेविरुद्धचा सशस्त्र बंड होता आणि तो समूळ उखडून काढायला हवा, असंही त्यांनी म्हटलंय.

आता सिनेटमध्ये या महाभियोग प्रस्तावाचं काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.