अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना टाईम मॅगझीनने वर्ष २०२० साठी ‘पर्सन ऑफ द इयर’ घोषित केलं आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत बहुप्रतिक्षित अशा राष्ट्राध्यक्षपदाचा निवडणुका पार पडल्या. निवडणुकांच्या निकालानंतर जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा विजय झाल्याचं घोषित करण्यात आलं होतं.

न्यूयॉर्क (Newyork).  अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना टाईम मॅगझीनने वर्ष २०२० साठी ‘पर्सन ऑफ द इयर’ घोषित केलं आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत बहुप्रतिक्षित अशा राष्ट्राध्यक्षपदाचा निवडणुका पार पडल्या. निवडणुकांच्या निकालानंतर जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा विजय झाल्याचं घोषित करण्यात आलं होतं.

डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना टाईम ‘पर्सन ऑफ द ईयर’ म्हणून निवडलं असल्याची माहिती वृत्तसंस्था एएफपीच्या अहवालातून मिळाली आहे. जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा मोठ्या फरकानं पराभव केला. तर दुसरीकडे कमला हॅरिस यांच्या हातीदेखील उप-राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं सोपवण्यात आली. गेल्या वर्षी पर्यावरणाच्या चळवळीत सहभागी असलेल्या ग्रेटा थनबर्गला ‘पर्सन ऑफ द इयर’ने सन्मानित करण्यात आलं होतं. तर २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना हा सन्मान मिळाला होता.

टाईम मॅगझीननं बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या फोटोंचा एक कव्हर फोटो तयार केला आहे. मॅगझीनच्या फोटोंसोबतच त्यांनी ‘चेंजिंग अमेरिका स्टोरी’ हे टायटल दिलं आहे. ७८ वर्षीय जो बायडेन यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांमध्ये ३०६ इलेक्ट्रोल व्होट्स मिळाले होते. तर डोनाल्ड ट्रम्प केवळ २३२ मतं मिळाली होती. “अमेरिकेची कहाणी बदलण्यासाठी, मतभेदाऐवजी सहानुभूतीला अधिक ताकद असल्याचं सिद्ध करण्यासाठी आणि कठिण काळातून पुढे जात असलेल्या जगाला एक दृष्टी देण्यासाठी,” असं टाईम मॅगझीननं लिहिलं आहे.