अर्रर्रर्र…बाबो! विमानाच्या पायऱ्या चढताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा गेला तोल आणि पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा ; Video व्हायरल

या व्हिडिओमध्ये बायडेन विमानाच्या पायऱ्या चढताना दिसत आहेत. मात्र, या पायऱ्या चढताना एक किंवा दोन नाही तर तब्बल तीन वेळा त्यांचा तोल गेला आहे. सुदैवानं या घटनेत त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. तीन वेळा घसरले तरीही बायडेन यांना पूर्ण पायऱ्या चढून होताच मागे वळून सलाम केला आणि विमानात जाऊन बसले.

    वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा विमानाच्या पायऱ्या चढताना तोल गेल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे जो बायडेन पूर्णपणे फिट आहेत का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

    या व्हिडिओमध्ये बायडेन विमानाच्या पायऱ्या चढताना दिसत आहेत. मात्र, या पायऱ्या चढताना एक किंवा दोन नाही तर तब्बल तीन वेळा त्यांचा तोल गेला आहे. सुदैवानं या घटनेत त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. तीन वेळा घसरले तरीही बायडेन यांना पूर्ण पायऱ्या चढून होताच मागे वळून सलाम केला आणि विमानात जाऊन बसले.

    जो बायडेन कुठे चालले होते ?

    जो बायडेन अँटलांटा दौऱ्यावर चालले होते. तिथे ते आशियाई-अमेरिकी नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. याठिकाणी जाण्यासाठी ते आपल्या एअरफोर्स वन या विमानानं रवाना होण्यासाठी पायऱ्या चढत होते. हे विमान जगातील सर्वात सुरक्षित आणि आलिशान समजलं जातं. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेव्हा भारतात आले होते तेव्हा या विमानाची खासियत सगळ्यांना समजली होती.

    दरम्यान, वॉशिंग्टनच्या जॉईंट बेस अँड्र्यूजमध्ये वेगवान वारे वाहत असल्याने ही घटना घडल्याचं व्हाईट हाऊसच्या महिला प्रवक्त्या कैरीन जीन यांनी सांगितलं.