जॉगिंग करणाऱ्या महिलेला दिसलं हँड ग्रेनेड, केलं पोलिसांना पाचारण; तपासाअंती सेक्स टॉय असल्याचा झाला उलगडा, वाचा संपूर्ण प्रकरण

ही घटना दक्षिण जर्मनी स्थित बवेरियन शहरात घडली. त्याचं झालं असं, एक महिला जॉगिंग करत होती आणि त्याचवेळी तिला एका पारदर्शक पॉलिथीन मध्ये ग्रेनेड बाँब सारखी दिसणारी वस्तू पडलेली दिसली. बाँब सारखी दिसणारी वस्तू पाहून पहिल्यांदा महिला घाबरली पण त्यानंतर तिने पोलिसांना याबाबत माहिती दिली. सूचना मिळताच पोलीस सतर्क झाली आणि घटनास्थळी तात्काळ दाखल झाली.

    बर्लिन : जर्मनी (Germany) मध्ये एक महिला (Woman) आश्चर्यचकित झाली. जंगलात भटकंती करताना हँड ग्रेनेड (Hand Grenade) पडलेलं दिसलं. महिलेने ताबडतोब पोलिसांना (Police) पाचारण करत याची माहिती दिल्यानंतर पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पण जेव्हा या हँडग्रेनेडची तपासणी करण्यात आली तर पोलीस आणि महिला दोघेही हैराण झाले, तपास अधिकाऱ्यांना तपासाअंती ते बाँब नसून ते एक सेक्स टॉय (Sex Toy) असल्याचा उलगडा झाला.

    परदेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना दक्षिण जर्मनी स्थित बवेरियन शहरात घडली. त्याचं झालं असं, एक महिला जॉगिंग करत होती आणि त्याचवेळी तिला एका पारदर्शक पॉलिथीन मध्ये ग्रेनेड बाँब सारखी दिसणारी वस्तू पडलेली दिसली. बाँब सारखी दिसणारी वस्तू पाहून पहिल्यांदा महिला घाबरली पण त्यानंतर तिने पोलिसांना याबाबत माहिती दिली. सूचना मिळताच पोलीस सतर्क झाली आणि घटनास्थळी तात्काळ दाखल झाली. यानंतप पोलिसांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला आणि लोकांच्या येण्या-जाण्यावरही निर्बंध घातले.

    जेव्हा पोलिसांच्या टीमने पूर्ण सुरक्षेसह पॉलिथीन चेक केलं तेव्हा ही वस्तू ग्रेनेडच्या रुपातील सेक्स टॉय निघालं. रिपोर्ट नुसार, घटनास्थळी बाँब विरोधी पथकही दाखल झालं होतं. रिपोर्ट नुसार, बाँब विरोधी पथकाने आपला बाँब सूट आणि रोबोटच्या मदतीने ते पॉलिथीन सुरक्षित स्थळी हलवलं आणि त्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. पॉलिथीनमध्ये हँड ग्रेनेडच्या स्वरुपातील एक सेक्स टॉय निघालं आणि याशिवाय पॉलिथीनमध्ये कंडोम आणि लुब्रिकेंट्सही आढळले यामुळे पोलिसही समजून चुकले की प्रत्यक्षात तो बाँब नव्हता. रिपोर्टमध्ये असं नमूद केलं आहे की, कंडोम आणि लुब्रिकेंट्स डिव्हाइस सारख्या दिसणाऱ्या डब्यात ठेवले होते, म्हणून ते ग्रेनेड असल्याचेच दिसत होते.