Johnson claims Rs 14,500 crore; 9000 women die of cancer

अमेरिकेत जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीने खालच्या न्यायालयांनी दिलेल्या 14500 कोटींची नुकसान भरपाई देण्याच्या निर्णयाच्या आदेशावर पुनर्विचार करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका सादर करण्यात आली आहे. ज्या महिलांनी कंपनीचे टाल्कम पावडर व त्या संबंधित उत्पादनांचा वापर केला होता त्यांना कॅन्सरसारख्या आजाराने ग्रासले होते त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. कंपनीच्या अर्जावर पुढील मंगळवारपर्यंत कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे.

  वॉशिंग्टन : अमेरिकेत जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीने खालच्या न्यायालयांनी दिलेल्या 14500 कोटींची नुकसान भरपाई देण्याच्या निर्णयाच्या आदेशावर पुनर्विचार करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका सादर करण्यात आली आहे. ज्या महिलांनी कंपनीचे टाल्कम पावडर व त्या संबंधित उत्पादनांचा वापर केला होता त्यांना कॅन्सरसारख्या आजाराने ग्रासले होते त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. कंपनीच्या अर्जावर पुढील मंगळवारपर्यंत कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे.

  कंपनीने तथ्य लपविले

  कंपनीविरोधात हे पहिलेच प्रकरण नसून यापूर्वीही एका अमेरिकन कोर्टोन फेब्रुवारीतही कंपनीवर 475 कोटींचा दंड ठोठावला होता. जॅक्लीन फॉक्स नामक महिलेचा ओव्हेरियन कॅन्सरने मृत्यू झाला होता. बेबी पावडरमध्ये नुकसानदायी तत्त्व असल्याचा आरोप नेहमीच केला जात आहे. या पावडरमध्ये जीवघेणे तत्त्व असल्याचे कंपनीला 1970 पासूनच माहित होते व ते त्यांनी हेतुपुरस्सर लपविले होते, असा दावा केला होता. दुसरीकडे, उत्पादनांपासून कॅन्सर होत नाही, असा दावा कंपनीने वैज्ञानिकांच्या अहवालासह केला होता.

  407 कोटींची नुकसानभरपाई देण्याचा आदेश

  मिसौरी येथील न्यायालयात सुनावणी दरम्यान बाजू मांडण्याचीच संधी मिळाली नाही, असा दावा जॉन्सन अॅण्ड़ जॉन्सन कंपनीने केला. सत्र न्यायालयाने 407 कोटी डॉलरची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते.

  कंपनीला होती माहिती

  जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीला या पावडरमध्ये अॅस्बटस आहेत याची माहिती होती असे न्यायाधीश रेक्स एम. बर्लीसन यांनी निर्णय देतेवेळी म्हटले होते. या पावडरचा वापर महिला व मुलांसाठी केला जातो. हे पावडर धोकादायक असतानाही 10 वर्षे सुरक्षित असल्याची चुकीची माहिती देण्यात आली व परिणामत: 9000 महिलांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला, असे म्हटले होते.

  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा