Johnson claims Rs 14,500 crore; 9000 women die of cancer

    वॉशिंग्टन : जॉन्सन अँड जॉन्सन या अमेरिकी कंपनीच्या काही उत्पादनांमध्ये बेन्झीन हे रसायन असल्याचे आढळून आले आहे. या रसायनामुळे माणसाला कर्करोग अर्थात कॅन्सर होण्याचा धोका असतो. त्यामुळे आपली सनस्क्रीन उत्पादने बाजारपेठेतून मागे घेण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या सनस्क्रीन उत्पादनांचे अंतर्गत परीक्षण करण्यात आले, त्यावेळी त्यात कमी प्रमाणात बेन्झीन हे रसायन असल्याचा शोध लागला. दरम्यान, कोणत्याच उत्पादनांच्या निर्मितीवेळी त्यात बेन्झीन घालत नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

    उत्पादने मागे घेणार

    अवीनो प्रोटेक्ट रिफ्रेश एअरोसोल सनस्क्रीन आणि चार न्यूट्रोजेना सनस्क्रीन व्हर्जन-बीच डिफेन्स एअरोसोल सनस्क्रीन, कूलड्राय सपोर्ट एअरोसोल सनस्क्रीन, इनव्हिजिबल डेली डिफेन्स एअरोसोल सनस्क्रीन आणि अल्ट्राशीअर एअरोसोल सनस्क्रीन ही उत्पादने कंपनी मागे घेणार आहे. ही उत्पादने अमेरिकेतल्या किरकोळ विक्रेत्यांकडे पाठवण्यात आली होती, असे सांगितले जात आहे. कंपनीच्या, तसेच एका स्वतंत्र प्रयोगशाळेत या उत्पादनांचे परीक्षण करण्यात आले होते. तेव्हा त्यात बेन्झीन असल्याचे निष्पन्न झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

    सनस्क्रीन वापरू नये, असे आवाहन ग्राहकांना करण्यात आले आहे. तसेच, ज्यांनी ही उत्पादने खरेदी केली आहेत, त्यांचे पैसे त्यांना परत केले जाणार आहेत. संबंधित व्यक्तींनी कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राला फोन करून आपले पैसे परत घ्यावेत, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.