अमेरिकेतील खलिस्तान समर्थकांचं आंदोलन, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाबाहेर खलिस्तानी झेंडे फडकवत त्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर केला. भारत सरकारनं केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून ते अन्यायकारक असल्याची भूमिका खलिस्तान समर्थकांनी घेतली आहे. हे कायदे रद्द करण्याची संयुक्त किसान मोर्चाची मागणी योग्यच असून त्यांच्या मागणीला आपलं समर्थन असल्याची भूमिका अमेरिकेतील खलिस्तान समर्थकांनी घेतलीय.

केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात खलिस्तानी घुसल्याचा आरोप काही घटक करत असताना अमेरिकेतील खलिस्तान समर्थकांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केलाय. पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील शेतकरी करत असलेल्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा असून त्यांच्या मागण्यांचं आम्ही समर्थन करत असल्याची भूमिका अमेरिकास्थित खलिस्तानी समर्थकांनी केलीय.

वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाबाहेर खलिस्तानी झेंडे फडकवत त्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर केला. भारत सरकारनं केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून ते अन्यायकारक असल्याची भूमिका खलिस्तान समर्थकांनी घेतली आहे. हे कायदे रद्द करण्याची संयुक्त किसान मोर्चाची मागणी योग्यच असून त्यांच्या मागणीला आपलं समर्थन असल्याची भूमिका अमेरिकेतील खलिस्तान समर्थकांनी घेतलीय.

शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान चांगलाच गोंधळ उडाला होता. काही शेतकऱ्यांनी ठरलेला मार्ग सोडून दिल्लीतील इतर भागात घुसण्याचा प्रयत्न केला. काही शेतकऱ्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर जाऊन झेंडा फडकावला. सुरुवातीला हा झेंडा खलिस्तानचा असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र प्रत्यक्षात हा झेंडा खलिस्तानचा नसून शीख धर्मियांचा निशान साहिब हा झेंडा असल्याचं स्पष्ट झालं.

मात्र, या आंदोलनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी शिस्त मोडल्याचा देशभरातून निषेध करण्यात आला. तर बहुतांश शेतकरी शिस्तबद्धरित्या वागले, काही जणांनी शिस्त मोडली असेल, तर ते खरे आंदोलक नव्हेत, अशी प्रतिक्रिया संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आलीय.