तालिबान्यांकडून किल लिस्ट तयार, लष्करी अधिकारी आणि पत्रकारांसह घराघरात जाऊन सर्च ऑपरेशन

तालिबान्यांकडून किल लिस्ट तयार करण्यात आली आहे. गेल्या 20 वर्षांत अफगाणिस्तानमधील ज्या अफगाणी नागरीकांनी अमेरिकेसह मित्र देशांच्या सैनिकांना मदत केली, असे तीन ते चार लाख लोक आहेत. परंतु आता तालिबानी या लोकांना खबरे म्हणून मारतील, अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच लष्करी अधिकारी आणि पत्रकारांसह घराघरात जाऊन सर्च ऑपरेशन केलं जात आहे.

    तालिबाननं अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबिज करताच मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तान तालिबान्यांच्या ताब्यात आल्यानंतर तिथे दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तालिबान्यांकडून किल लिस्ट तयार करण्यात आली आहे. गेल्या 20 वर्षांत अफगाणिस्तानमधील ज्या अफगाणी नागरीकांनी अमेरिकेसह मित्र देशांच्या सैनिकांना मदत केली, असे तीन ते चार लाख लोक आहेत. परंतु आता तालिबानी या लोकांना खबरे म्हणून मारतील, अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच लष्करी अधिकारी आणि पत्रकारांसह घराघरात जाऊन सर्च ऑपरेशन केलं जात आहे.

    अफगाणिस्तानातील तुरुंगांमध्ये कैद असलेल्या २३०० खतरनाक दशतवाद्यांची मुक्तता केली आहे. यात टीटीपीचे उपाध्यक्ष फकीर मोहम्मदचाही समावेश आहे. तुरुंगातून मुक्त करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये तहरिक-ए-तालिबान, अल कायदा आणि आयएसआयएस संघटनेतील दहशतवाद्यांचा समावेश आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मुक्त करण्यात आलेल्या कैद्यांपैकी काही कैद्यांची तर गेल्याच आठवड्यात मुक्तता करण्यात आली आहे. हे कैदी कंधार, बगराम आणि काबुल येथील तुरुंगामध्ये कैद होते. त्यांची सुटका पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसाठी देखील चिंतेची बाब मानली जात आहे.