kim jong un

किम जोंग उन(kim jong un) यांनी उत्तर कोरियामध्ये कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी कडक नियम(strict corona related rules in north korea) लादले आहेत. नियम मोडल्यास तिथे मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. 

उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन(kim jong un) यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. किम जोंग उन यांनी उत्तर कोरियामध्ये कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी कडक नियम(strict corona related rules in north korea) लादले आहेत. नियम मोडल्यास तिथे मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते.

उत्तर कोरियात किम जोंग उन यांनी कोरोनाबाबत घालून दिलेले नियम मोडल्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. कारण त्याला किम जोंग उन यांनी मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. संबंधित व्यक्तीला फायरिंग स्क्वाडच्या हाती सोपवण्यात आलं. मग त्या  व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या. किम जोंग उन यांनी आपल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी चीनच्या सीमेवर अँटी एअरक्राफ्ट बंदुकाही तैनात केल्या आहेत. या बंदुकीने एका किलोमीटरपर्यंतही कोणालाही गोळ्या घालता येऊ शकतात.

किम जोंग उन यांनी २८ नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीला कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. नियम मोडत त्या व्यक्तीनं चिनी सामानाची तस्करी केल्याचा आरोप करण्यात आला होता. तस्करी करताना त्या व्यक्तीला स्थानिक सुरक्षा दलानं ताब्यात घेतलं. मग त्याला गोळ्या घालण्यात आल्या.