किम जोंग उनचं वजन आजारपणामुळे झालं कमी ? नव्या व्हिडिओमुळे चर्चांना आले उधाण

किम जोंग उनने(Kim Jong Un) खूपच वजन घटवलं(weight Loss) आहे. किमच्या नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मधील फोटोची, एप्रिल २०२१ आणि जून २०२१ च्या फोटोशी तुलना केल्यास हे स्पष्ट होतंय की त्याने वजन घटवलं आहे.

  प्योंगयांग : गेल्या अनेक महिन्यांपासून गायब असलेला किम जोंग उन(Kim Jong Un) नुकताच एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसला. मात्र यावेळी तो एकदम बारीक झाल्याचं पाहायलं मिळालं. मात्र त्याने वजन कमी केलं (Kim Jong Un)आहे की त्याची तब्येत खराब झाली आहे याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत

  उत्तर कोरिया आणि तिथल्या नेत्यांवर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, किम जोंग उनने खूपच वजन घटवलं आहे. किमच्या नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मधील फोटोची, एप्रिल २०२१ आणि जून २०२१ च्या फोटोशी तुलना केल्यास हे स्पष्ट होतंय की त्याने वजन घटवलं आहे. जवळपास महिनाभर गायब झाल्यानंतर किम गेल्या आठवड्यातच सार्वजनिक ठिकाणी दिसला होता.

  किमच्या फोटोंच्या सखोल विश्लेषणानंतर असे निरीक्षण समोर आले की, हुकूमशहा किम स्विस कंपनीचे घड्याळ वापरतो. या घड्याळाच्या पट्ट्याची लांबी त्याच्या मनगटाच्या खालपर्यंत पोहोचली आहे, याचाच अर्थ किमचे मनगट बारीक झाले आहे.

  किमने स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी वजन कमी केले असेल तर ते ठीक आहे. परंतु, जर वजन आपोआप कमी झाले असेल, तर ते एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते.
  जर हुकूमशहा किमची तब्येत खराब असेल तर, त्याचा वारसा निवडण्याची प्रक्रिया पडद्यामागे सुरु झाली असेल आणि येणारा काळ जगासाठी अत्यंत त्रासदायक ठरू शकेल.

  उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचे आरोग्य, दक्षिण कोरियाची राष्ट्रीय इंटेलिजेंस सर्व्हिस (एनआयएस) यासह जगभरातील तज्ज्ञ आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये तीव्र रुचीचा विषय बनला आहे. कारण किम अनेक वेळा मोठ्या कालावधीसाठी गायब देखील झाला आहे.

  दक्षिण कोरियामधील यूएस स्पेशल ऑपरेशन्स कमांडचे इंटेलिजन्स ऑफिसर माईक ब्रोडका म्हणाले की, ‘हुकूमशहाचे वजन कमी होणे हे त्याच्या निरोगी जीवनशैलीचा भाग असू शकते. परंतु, यामुळे अनेक गंभीर प्रश्नही उपस्थित होत आहेत आणि आम्हाला यावर लक्ष ठेवावे लागेल.’

  १ जून रोजी समोर आलेल्या या अहवालात, उत्तर कोरियामध्ये ‘सेकंड-इन-कमांड’ची एक पोस्ट तयार करण्यात आल्याचे सांगितले आहे. यामुळे उत्तर कोरियामध्ये काहीही सुरळीत नाही, या वस्तुस्थितीची पुष्टी होत आहे. मात्र, हुकूमशहा आणि कोरिया याच्याविषयी नेमके काहीही सांगणे कठीणच आहे. कारण तिथून येणाऱ्या सगळ्या बातम्या या फिल्टर केल्या जातात. पण, किमच्या आजारपणाची बातमी खरी असेल, तर त्याचा उत्तराधिकारी कोण आहे आणि जगासाठी तो कोणती नवीन समस्या निर्माण करतो, याकडे पूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.