kim jong un

तुमची झोप उडेल असा कोणताही निर्णय घेऊ नका, अशी धमकी किम यो जोंगने(kim yo jong threatened america) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना दिली आहे. जो बायडेन यांच्या प्रशासनातील अधिकारी टोकियो आणि सियोलमध्ये आलेले असताना उत्तर कोरियाने हा इशारा दिला आहे.

    उत्तर कोरिया(north korea) आणि अमेरिकेचे(america) संबंध पुन्हा ताणले जाण्याची शक्यता आहे. कारण उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन(kim jong un) यांची बहीण किम यो जोंग यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे. किम यो जोंग या किम जोंग उन यांच्या प्रमुख सल्लागार आहेत.तुमची झोप उडेल असा कोणताही निर्णय घेऊ नका, अशी धमकी किमने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना दिली आहे. जो बायडेन यांच्या प्रशासनातील अधिकारी टोकियो आणि सियोलमध्ये आलेले असताना उत्तर कोरियाने हा इशारा दिला आहे. उत्तर कोरियाने यासंदर्भात एक पत्रक जारी केले आहे.

    किम यो जोंग यांनी अमेरिकेला इशारा देताना, पुढची चार वर्ष तुम्हाला सुखाने झोपण्याची इच्छा असेल तर आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करणारं कोणतही पाऊल उचलू नका,” असं म्हटलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन आणि संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन उत्तर कोरिया आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी जपान आणि उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त ते आशियामध्ये दाखल झाल्यानंतर उत्तर कोरियाने अमेरिकेला हा इशारा दिला आहे.

    किम यो जोंग यांनी उत्तर कोरियाला दक्षिण कोरियासोबत सहकार्य करावंसं वाटलं नाही तर लष्करी तणाव समाप्त करण्यासंदर्भात २०१८ साली केलेल्या करारामधून बाहेर पडण्याचा निर्णयही आम्ही घेऊ शकतो असं म्हटलं आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये शांतता टीकवून ठेवण्यासाठी दहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली समितीही बरखास्त करण्याची धमकी किम यो जोंग यांनी दिली आहे.

    दक्षिण कोरिया आणि अमेरिकेदरम्यान वार्षिक लष्करी अभ्यास गेल्या आठवड्यापासून सुरु झाला आहे. यापूर्वी अनेकदा उत्तर कोरियाने या संयुक्त अभ्यासाला दक्षिण कोरिया आक्रमणाची तयारी करत आहे असं म्हणत यावर आक्षेप घेत उत्तर कोरियाने अनेकदा क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या आहेत.