ind china border

भारतासोबतच्या संघर्षानंतर चीनने एलएसी जवळच्या ज्या भागांवर ताबा मिळवला होता, त्यातील अनेक मुख्य भागातून चीन मागे हटला नाही, असा दावा अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनचे प्रमुख सैन्य कमांडर अॅडमिरल फिलिप एस. डेविडसन केला आहे. अमेरिकेने भारताला माहिती आणि थंड भागामध्ये आवश्यक असणारे कपडे, उपकरणे पुरवून सीमा वाद सोडवण्यास मदत केली आहे. तसेच चीनने सीमेवर निर्माण केलेल्या तणावामुळे भारताला जाणीव झालीये की त्यांना संरक्षण क्षेत्रात अजून दुसऱ्या देशांच्या सहकार्याची गरज आहे असेही ते म्हणाले.

    वॉशिंग्टन :  भारतासोबतच्या संघर्षानंतर चीनने एलएसी जवळच्या ज्या भागांवर ताबा मिळवला होता, त्यातील अनेक मुख्य भागातून चीन मागे हटला नाही, असा दावा अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनचे प्रमुख सैन्य कमांडर अॅडमिरल फिलिप एस. डेविडसन केला आहे.

    अमेरिकेने भारताला माहिती आणि थंड भागामध्ये आवश्यक असणारे कपडे, उपकरणे पुरवून सीमा वाद सोडवण्यास मदत केली आहे. तसेच चीनने सीमेवर निर्माण केलेल्या तणावामुळे भारताला जाणीव झालीये की त्यांना संरक्षण क्षेत्रात अजून दुसऱ्या देशांच्या सहकार्याची गरज आहे असेही ते म्हणाले.

    पीएलएने सुरुवातीच्या संघर्षात ज्या भागावर ताबा मिळवला होता, त्यातील अनेक भागातून त्यांनी माघार घेतली नाही. याभागात चिनी सैन्य अजूनही तैनात आहे. भारताला संकटाच्या वेळी आम्ही माहिती पुरवली आहे. शिवाय काही उपकरणे पुरवली आहेत. आम्ही सागरी सहयोगालाही प्रोत्साहन देत आहोत. चीनला टक्कर देण्यासाठी चार देशांचे क्वाड प्रभावी ठरू शकते, असेही ते म्हणाले. ऑस्ट्रेलिया आणि जापान आपल्याला महत्त्वाची भूमिका बजावता दिसतील, असे डेविडसन म्हणाले.