Lambda terror after 'Delta', havoc in 30 countries; Is India in danger or not?

डेल्टा व्हेरियंटपेक्षा कोरोनाचा लॅमडा व्हॅरियंट अधिक धोकादायक आणि जीवघेणा असल्याचा दावा मलेशियाच्या आरोग्य विभागाने केल्याने चिंतेत भर पडली आहे. गेल्या काही दिवसांत जवळपास 30 पेक्षा अधिक देशांमध्ये लॅमडा व्हेरिएट आढळून आला आहे.

    दिल्ली : जगावर कोरोना महामारीचे संकट कायम आहे. कोरोना विषाणू सातत्याने आपले रुप बदलत आहे. सध्या डेल्टा व्हेरिएंटबाबत चिंता आहे. कारण, डेल्टा व्हेरियंट अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक असल्याचे सांगितले आहे.

    डेल्टा व्हेरियंटपेक्षा कोरोनाचा लॅमडा व्हॅरियंट अधिक धोकादायक आणि जीवघेणा असल्याचा दावा मलेशियाच्या आरोग्य विभागाने केल्याने चिंतेत भर पडली आहे. गेल्या काही दिवसांत जवळपास 30 पेक्षा अधिक देशांमध्ये लॅमडा व्हेरिएट आढळून आला आहे.

    लॅमडा व्हेरियंटचा उगम पेरु देशामध्ये झाल्याची नोंद आहे. दक्षिण अमेरिकेतील या देशाचा कोरोना मृत्यूदर जगात सर्वाधिक आहे. लॅमडा व्हेरिएंट यूकेमध्ये सुद्धा आढळून आला आहे. पेरु देशात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी जवळपास 82 टक्के रुग्णांमध्ये लॅमडा व्हेरिएंट आढळून आला होता. चिलीमध्ये एकूण रुग्णांपैकी 31 टक्के रुग्ण डेल्टा व्हेरिएंटचे होते.