रन काढायला गेला आणि पडला बॅट्समन; प्रतिस्पर्धी टीमची कृती पाहून म्हणाल १ नंबर काम हाय भावा, पाहा VIDEO

लँकशरला विजयासाठी १८ बॉलमध्ये १५ रनची आवश्यकता होती. स्टीव्हन क्रॉफ्ट आणि ल्यूक वेल्स हे दोघं बॅटींग करत होते. वेल्सनं त्यावेळी एक रन घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला असलेला क्रॉफ्ट देखील रन काढण्यासाठी पळाला. त्यावेळी अचानक त्याचे संतुलन गेले आणि तो मैदानात पडला.

    लंडन : इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कॅप्टन जो रुटच्या (Joe Root) यॉर्कशर या टीमनं खिलाडू वृत्तीचं उदाहरण देत सर्वांचं मन जिंकलं आहे. इंग्लंडमधील टी20 स्पर्धेतील (Vitality T20 Blast) सामन्यात रुटची टीम पराभूत झाली. मात्र त्यांनी सर्वांचं मन जिंकलं. यॉर्कशरनं या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत लँकशर समोर १२९ रनचं लक्ष्य ठेवलं होतं.

    काय घडला प्रसंग?

    लँकशरला विजयासाठी १८ बॉलमध्ये १५ रनची आवश्यकता होती. स्टीव्हन क्रॉफ्ट आणि ल्यूक वेल्स हे दोघं बॅटींग करत होते. वेल्सनं त्यावेळी एक रन घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला असलेला क्रॉफ्ट देखील रन काढण्यासाठी पळाला. त्यावेळी अचानक त्याचे संतुलन गेले आणि तो मैदानात पडला. क्रॉफ्ट इतक्या जोरात पडला की त्याला लवकर उठणे देखील शक्य नव्हते. त्यावेळी रुटच्या टीमनं खिलाडू वृत्ती दाखवत त्याला रन आऊट न करण्याचा निर्णय घेतला.

    हा प्रकार घडला तेव्हा क्रॉफ्टचा पार्टनर वेल्स २७ रनवर नाबाद होता. त्यानंतर लगेच तो ३० रनवर आऊट झाला. त्यानंतर क्रॉफ्टनं डॅनी लँबच्या मदतनीनं टीमला विजय मिळवून दिला. क्रॉफ्ट २६ रनवर नाबाद राहिला. यॉर्कशरचा ४ विकेट्सनं पराभव झाला. मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्व जण यॉर्कशर टीमची प्रशंसा करत आहेत.

    lancashire steven croft down injured mid run joe root yorkshire decided to not run out cricket vitality t20