महाभयंकर! भूस्खलनामुळे घरं उद्धवस्त; १९ जण बेपत्ता, अतिवृष्टीचा कहर आणि व्हिडिओ व्हायरल…

प्रांताचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ताकामिची सुगीआमा म्हणाले, बचाव कामगार बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. अतिवृष्टीची शक्यता पाहता काही लोकांनी आधीच या परिसरातून दुसरीकडे स्थलांतर केलं होतं.

    जपान : जपानची (Japan) राजधानी टोकियोच्या पश्चिमी अतामी शहरात (Atami city)भूस्खलनामुळे (Mudslide) अनेक घरे उद्धवस्त झाली आहेत. यात कमीत कमी 19 लोक बेपत्ता झाले आहेत. अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ही घटना शनिवारी सकाळी अतामी शहरात घडली. घटनेत किमान 19 लोक बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

    प्रांताचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ताकामिची सुगीआमा म्हणाले, बचाव कामगार बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. अतिवृष्टीची शक्यता पाहता काही लोकांनी आधीच या परिसरातून दुसरीकडे स्थलांतर केलं होतं. परंतु याबाबत सध्या अधिक माहिती मिळू शकली नाही. या आठवड्याच्या सुरूवातीपासूनच जपानमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.

    टेलिव्हिजन फुटेजमध्ये, एक शक्तिशाली काळ्या रंगाचा चिखलाचा भलामोठा गोळा डोंगरावरून खाली येताना दिसतो. यादरम्यान, हा गोळा वाटेत असलेल्या घरांवरुन जात असून ही घरं नष्ट करत असल्याचं पाहायला मिळत आहे.