२६/११ निमित्त लष्कर-ए-तोयबा करणार मृत दहशतवाद्यांसाठी प्रार्थना

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या १० दहशतवाद्यांसाठी विशेष प्रार्थनेचं आयोजन लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेनं केलंय. जमात-उद-दावा या संघटनेच्या मदतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पंजाबमधील साहिवाल शहरात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्याला आज (गुरुवार) १२ वर्षं पूर्ण होतायत. या हल्ल्याची सूत्रधार असणाऱ्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेनं यानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या १० दहशतवाद्यांसाठी विशेष प्रार्थनेचं आयोजन लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेनं केलंय. जमात-उद-दावा या संघटनेच्या मदतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पंजाबमधील साहिवाल शहरात हा कार्यक्रम पार पडणार आहे. दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांसाठी विशेष प्रार्थना करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आलाय. लष्कर आणि जमात एकत्रित हा कार्यक्रम करणार असून वेगवेगळ्या ठिकाणच्या मशीदींमध्ये प्रार्थना करण्यात येणार असल्याचं समजतंय.

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी लष्कर-ए-तोयबाच्या १० दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश केला होता. सीएसटी, मरीन ड्राईव्ह आणि दक्षिण मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात १८ पोलिसांसह १६६ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्यातील ९ दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं. तर अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं होतं. २१ नोव्हेंबर २०१२ या दिवशी कसाबला फासावर लटकवण्यात आलं.

या हल्ल्यात तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे, मेजर संदीप उन्नीकृष्णन, मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळसकर यांना वीरमरण आलं होतं.

गेल्याच महिन्यात अमेरिकेची तपास यंत्रणा असणाऱ्या एफआयएनं मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचाच हात असल्याचं मान्य केलं होतं. मुंबईतील ताज हॉटेलवर झालेल्या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचे ११ दहशतवादी सहभागी होते, हे देखील एफआयएनं स्पष्टपणे सांगितलं होतं.