आकाशात झेप घेताच विमानाच्या इंजिनने घेतला पेट, अन् पुढे काय झालं ते तुम्हीचं पाहा, Video व्हायरल

विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार बोईंग ७७७-२०० हे प्रवासी विमान १० क्रू मेम्बर्स आणि २३१ प्रवाशी घेऊन होनोलूलूकडे निघाले होते. डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उडाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानाच्या इंजिनाने पेट घेतला. त्यानंतर विमान तातडीने पुन्हा डेन्व्हेर विमानतळावर उतरवण्यात आले.

    न्यूयॉर्क : धावपट्टीवरून आकाशात झेपावलेल्या विमानाच्या इंजिने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विमान आकाशात झेप घेताच काही वेळातच डावीकडून बाजूस धूर येऊन इंजिनमध्ये आग लागली. अचानक घडलेल्या या घटनेने विमानातील प्रवाशांचा जीव मुठीत आला होता. अमेरिकेतील डेन्व्हेर विमानतळावरून उड्डाण भरल्यानंतर ही थरारक घटना घडली आहे.

    विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार बोईंग ७७७-२०० हे प्रवासी विमान १० क्रू मेम्बर्स आणि २३१ प्रवाशी घेऊन होनोलूलूकडे निघाले होते. डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उडाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानाच्या इंजिनाने पेट घेतला. त्यानंतर विमान तातडीने पुन्हा डेन्व्हेर विमानतळावर उतरवण्यात आले. प्रसंगावधान राखत वेळीच विमान उतरवण्यात आल्याने या थरारक घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.

    विमान उतरवण्यात आल्यानंतर ब्रुमफिल्ड पोलिसांनी विमानाचे फोटो पोस्ट केले आहेत. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.