लोकेशन ट्रॅकिंगचा होतोय गैरवापर, युझर्सच्या अति संवेदनशील माहितीची चोरी

लोकेशेन ट्रॅकिंग डेटामधून कोणती खासगी माहिती गहाळ होते यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. बोलोगना युनिव्हर्सिटी, इटली आणि लंडन युनिव्हर्सिटीच्या दोन संशोधकांनी ऍप कंपन्या कशापद्धतीने खासगीपणाच्या पॉलिसीचे उल्लंघन करत आहेत, हे दाखवून दिलंय.

    लंडन : लोकेशन ट्रॅकिंगला परवानगी दिल्यानंतर आपण अत्यंत महत्त्वाची खासगी माहिती कंपन्यांना देऊन टाकतो. हा अशाप्रकारचा पहिला अभ्यास असून यातून लोकेशेन ट्रॅकिंग डेटामधून कोणती खासगी माहिती गहाळ होते यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. बोलोगना युनिव्हर्सिटी, इटली आणि लंडन युनिव्हर्सिटीच्या दोन संशोधकांनी ऍप कंपन्या कशापद्धतीने खासगीपणाच्या पॉलिसीचे उल्लंघन करत आहेत, हे दाखवून दिलंय.

    संशोधकांनी ट्रॅकिंग अ‍ॅडवायझर TrackingAdvisor नावाचे एक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. यात युझर्सच्या लोकेशनसंबंधी माहिती गोळा केली जाते. लोकशेन डेटाच्या माध्यमातून हे ऍप युझर्सचा खासगी डेटा मिळवते. तसेच या माहितीच्या सत्यतेविषयी जाणून घेण्यासाठी फिडबॅकही मागते. युझर्स ऍप किंवा सेवा घेताना अनेकदा डेटाच्या वापराला परवानगी देऊन टाकतात. यामुळे संवेदनशील खासगी माहिती कंपन्यांना मिळू शकते याची कसलही जाणीव युझर्सला नसते. विशेष करुन लोकेशन ट्रॅकिंकसंबंधी हा धोका जास्त असतो, असं मायक्रो मुसोलेसी म्हणाले.