कचऱ्यात सापडले ५५ लाखांच्या लॉटरीचे तिकीट आणि नशीबच पालटले

कोणाचे नशीब (Luck) कधी अन् कसे उजळेल हे कोणालाच सांगता येत नाही. याचाच प्रत्यय ब्रिटेनमधील एका दाम्पत्याला आला.

लंडन. कोणाचे नशीब (Luck) कधी अन् कसे उजळेल हे कोणालाच सांगता येत नाही. याचाच प्रत्यय ब्रिटेनमधील एका दाम्पत्याला आला. ते दाम्पत्य रस्त्यावरून जात असताना त्यांना कचऱ्यात एक डब्बा दिसला. तो डब्बा उघडला असता त्यात त्यांना लॉटरीचे तिकीट सापडले. त्यांना सापडलेल्या लॉटरीच्या तिकीटातून ते लखपती बनले.  ब्रिटनचे रहिवासी असलेले जोआने ज्वायनसन या दाम्पत्यांनी एकदा लॉटरीचे (lottery) तिकीट खरेदी केले.

काही दिवसांनी त्यांचे लॉटरीचे तिकीट गहाळ झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर एकदा पावसाळ्यात हे दाम्पत्य पायी जात होते. तेव्हा त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या कचरापेटीत एक डब्बा आढळला. तो डब्बा उघडून पाहिला असता, त्यांना खूप मोठा आनंद झाला, कारण त्या डब्ब्यात त्यांना हरवलेले लॉटरी तिकीट सापडले. अन् काय आश्चर्य त्यांना सापडलेल्या लॉटरीचे तिकीट त्यांना लागलेही. त्यामुळे त्यांना या लॉटरीमधून ६६ हजार पाऊंड म्हणजे ५५ लाख रुपयांचे बक्षीस लागले.

या लॉटरी तिकिटाला ६६,००० पाऊंडचे (सुमारे ५५.२५ लाख रुपये) बक्षीस लागले होते. मर्सीसाइड या शहरात राहणाऱ्या जोआने जॉयन्सन या महिलेने स्थानिक दुकानातून हे तिकिट विकत घेतलेहोते. या तिकिटाची किंमत तीन पाऊंड होती. स्पॅनिश लॉटरीचे हे तिकिट तिने तिथेच फेकून दिले होते. मात्र तीन दिवसांपूर्वी याच तिकिटाला बक्षिस लागले होते.  ते तिकिट कचरापेटीत सापडल्यावर ती अचंबितच झाली. आता या पैशांतून आपल्या जोडीदारासोबत लग्न करण्याची तिची योजना आहे.

‘‘सर्वात आधी मी डायलानला (तिचा जोडीदार) आठवण करून दिली, की १५ वर्षांपूर्वी त्याने विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता. आता आम्ही लग्न करू शकतो. मला लग्नाची नेहमीच इच्छा होती, परंतु लग्न करण्याएवढे पैसे आतापर्यंत आमच्याकडे नव्हते,’’ असे ती म्हणाली.