काळखुणा दिसू लागल्या, अ‍ॅस्ट्राझेनेका लसीमुळे रक्तामध्ये गाठी; सहा देशांनी वापर थांबवला

डेन्मार्क, इटली आणि नॉर्वेसह सहा देशांमधील काही नागरिकांच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी बनू लागल्याचे समोर आले आहे. यामुळे या देशांनी हा प्रकार गंभीरतेने घेतला असून या लसीच्या परिणामांवर चौकशी सुरू केली आहे. युरोपियन मेडिसिन एजन्सीने सध्यातरी याबाबत कोणतेही संकेत सापडलेले नाहीत.

    वृत्तसंस्था, कोपेनहेगन.

    कोरोना महामारीला रोखण्यासाठी अनेक देश ब्रिटनची मोठी कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचा आपत्कालीन वापर करत आहेत. मात्र, या कंपनीची लस वादात सापडण्याची शक्यता आहे. ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार होत असल्याचे समोर येऊ लागल्याने युरोपच्याच सहा देशांनी या लसीचा वापर करणे थांबविले आहे.

    डेन्मार्क, इटली आणि नॉर्वेसह सहा देशांमधील काही नागरिकांच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी बनू लागल्याचे समोर आले आहे. यामुळे या देशांनी हा प्रकार गंभीरतेने घेतला असून या लसीच्या परिणामांवर चौकशी सुरू केली आहे. युरोपियन मेडिसिन एजन्सीने सध्यातरी याबाबत कोणतेही संकेत सापडलेले नाहीत. अ‍ॅस्ट्राझिनेकाची लस घेतल्यानंतर अशा प्रकारची हालत होत असल्याचे स्पष्ट झालेले नाही, असे म्हटले आहे.

    १७ हून अधिक देशांना पुरवठा

    चार आणखी युरोपीय देश एस्टोनिया, लातविया, लिथुआनिया व लक्जमबर्ग या देशांनीही कोरोना लसीकरण थांबविले आहे. १७ युरोपीय देशांपैकी १० देशांना कोरोना लसीचा डोस पाठविण्यात आला आहे. डेन्मार्कच्या हेल्थ अथॉरिटीचे संचालक सोरेन ब्रोसट्रॉम यांनी सांगितले की, आम्ही अ‍ॅस्ट्राझिनेकाची लस वापरण्यास नकार दिला नसून तात्पुरत्या स्वरूपात वापर थांबविला आहे. आमच्याकडे लस घेतल्यानंतर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.