‘त्या’ महिलेने एकाच वेळी दिला ९ बाळांना जन्म, दुर्मिळ घटनेने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ पडले बुचकळ्यात

 मालीमधील हलिमा सिझ (Halima Cisse) या २५ वर्षीय महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना(mali woman gave birth to 9 babies) जन्म दिला.

    बामाको : माली (Mali woman Gave birth to 9 babies) या पश्चिम आफ्रिकन देशातील बाईने एकाच वेळी नऊ बाळांना (Nonuplets) जन्म दिला आहे. महिलेच्या गर्भात सात अर्भक असल्याचा अंदाज डॉक्टरांनी आधी वर्तवला होता. मात्र प्रसुतीवेळी तिच्या गर्भातून नऊ बाळांनी जन्म घेतला. ती ९ बाळं आणि बाळंतीण सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे.

    मालीमधील हलिमा सिझ (Halima Cisse) या २५ वर्षीय महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला. तिची जास्तीत जास्त काळजी घेऊन प्रसुती करण्यासाठी तिला ३० मार्च रोजी मोरोक्को (Morocco) या उत्तर आफ्रिकन देशात स्थलांतरित करण्यात आले होते.

    सुरुवातीला महिलेच्या गर्भात सात बाळं असल्याचा डॉक्टरांचा कयास होता. मोरोक्को सरकारने मात्र या अतिदुर्मिळ प्रसुतीबाबत जाहीर भाष्य केलेलं नाही. मोरोक्को आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी आपल्या देशातील रुग्णालयात अशी प्रसुती झाल्याची माहिती नसल्याचं सांगितलं. मात्र माली सरकारने हलिमाने पाच मुलगे आणि चार मुलींना जन्म दिल्याची घोषणा केली. सिझेरियन करुन तिची प्रसुती करण्यात आली.