man jumped in the lake for 365 days

कोरोनाकाळात दररोज न विसरता पाण्यात उडी मारणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ (Man Jumping In Lake) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. गेल्या ३६५ दिवसांंमध्ये एकदाही त्या माणसाने तलावात उडी मारण्याचा आपला दिनक्रम मोडलेला नाही.

    पाण्यामध्ये डुंबणं प्रत्येकालाच आवडतं. आपण पाण्यात मजेसाठी किंवा आंघोळीसाठी जात असतो पण सध्या सोशल मीडियावर अशा माणसाची चर्चा सुरु आहे जो काहीही कारण नसताना गेले ३६५ दिवस रोज तलावात(Guy Jumping In Lake For 365 Days) उडी मारून परत येत आहे.

    कोरोनाकाळात दररोज न विसरता पाण्यात उडी मारणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ (Man Jumping In Lake) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. गेल्या ३६५ दिवसांंमध्ये एकदाही त्या माणसाने तलावात उडी मारण्याचा आपला दिनक्रम मोडलेला नाही. डॅन ओकोनोर असं या माणसाचं नाव आहे. तो शिकागोमध्ये राहतो. मिशिगन तलावात त्याने गेल्या वर्षी १२ जूनला उडी मारणं सुरू केलं. यावर्षीच्या १२ जूनला त्याच्या तलावात उडी मारण्याच्या दिनक्रमाला वर्ष पूर्ण झालं आहे.


    व्हिडीओत आपण पाहू शकतो की डॅन फक्त तलावात उडी मारतो आणि लगेच बाहेर येतो. डॅनने तणावमुक्त राहण्यासाठी असाच हा विचित्र मार्ग निवडला आहे.कोरोना महासाथीत कित्येक लोक मानसिक तणावाशीही लढा देत आहेत. प्रत्येक जण आपलं मानसिक आरोग्य राखण्यासाठी प्रयत्न करत आहे.

    डॅन सांगतो, पाण्यात उडी मारल्यानंतर मला वाटतं की माझ्यापर्यंत कोणताच आवाज पोहोचू शकत नाही. तिथं मी फक्त स्वतःसोबत असतो. ध्यानाच्या स्थिती जातो.
    जेव्हा थंडीत पाणी गोठलं होतं. तेव्हा बर्फामध्ये एक खड्डा बनवून तिथं त्याने उडी मारायला सुरुवात केली. यादरम्यान त्याच्या शरीरावर जखमाही झाल्या.पण त्याने त्याचं काम थांबवलं नाही.