एका रात्रीत विसरून गेला २० वर्षांची मेमरी

    अमेरिकेतील टेक्सासमध्ये एक अजब घटना घडली आहे. येथील एका महाशयांची मेमरी एका रात्रीत गेली. सकाळी उठल्यावर ऑफिसला निघण्याऐवजी ते स्कूल बॅग भरू लागले. त्यांची मेमरी तब्बल २० वर्षांनी मागे गेली. माहितीनुसार, ३७ वर्षाचे डॅनियल पोर्टर व्यवसायाने हिअरिंग स्पेशालिस्ट आहेत. ते रात्री आरामात झोपले होते. सकाळी त्यांना जाग आली तेव्हा त्यांना आजूबाजूचे काहीच ओळखता येत नव्हते.

    ते आपल्या पत्नीला आणि मुलीलाही ओळखू शकत नव्हते. त्यांनी ऑफिसला जाण्याऐवजी शाळेची बॅग भरायला सुरुवात केली. त्यांची स्मृती २० वर्षे मागे गेली होती. ते स्वतःला शाळेतील विद्यार्थी समजत होते. त्यांना त्यांच्या पत्नीकडे बघून असेही वाटत होते की, तिने त्यांना किडनॅप केले आहे. त्यांनी स्वतःला आरशात बघितले. त्यांना स्वतःवरच विश्‍वास बसत नव्हता की, १७ व्या वर्षी ते इतके लहान ४ कसे दिसू शकतात.

    त्यांची बायको त्यांना घेऊन माहेरी गेली. त्यांची मुलगी त्यांना सर्व आठवून देण्याचा प्रयत्न करत होती पण त्यांना फक्त त्यांचे स्वतः चे घर आठवत होते. ते घरातील पाळीव प्राण्यांकडे पाहून लहान मुलांप्रमाणे घाबरत होते. सुरुवातीला डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबाला सांगितले की, हा शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे. २४ तासांमध्ये त्यांना सर्व काही आठवू लागेल. पण या गोष्टीला आता वर्ष झाले. डॅनियल यांना गेल्या २० वर्षांतले काहीही आठवत नाही. डॉक्टर म्हणत आहेत की, त्यांना कसला तरी जबरदस्त मानसिक धक्का बसल्यामुळे असे झाले आहे. जानेवारी २०२०मध्ये डॅनियल यांची नोकरी गेली होती.

    man loses memory 20 years of thinks he is in high school in one night