bull riding

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ(Video) व्हायरल होत आहे. ज्यात एका व्यक्तीने पिसाळलेल्या रेड्यावर रायडिंग (Man Riding on bull) करण्याचा प्रयत्न केला. पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

    पिसाळलेल्या कोणत्याही प्राण्याला आवरण म्हणजे खूप कठीण काम असतं. मात्र काहीजण हे काम खूप सहजपणे करतात तर काहींच्या पदरी निराशा येते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ(Video) व्हायरल होत आहे. ज्यात एका व्यक्तीने पिसाळलेल्या रेड्यावर रायडिंग (Man Riding on bull) करण्याचा प्रयत्न केला. पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

    पिसाळलेल्या  प्राणी आवरला नाही, तो जास्तच आक्रमक झाला तर त्याला आवरणाऱ्या व्यक्तीच्या ते जीवावरही बेतू शकतं. पण काही जण तर अगदी खेळ म्हणून अशा प्राण्यांवर रायडिंग करण्याचा प्रयत्न करतात. हा व्हिडिओ तसाच आहे.

    व्हिडिओत आपण पाहू शकतो की, रेड्याला दोरीने बांधण्यात आलं आहे. एका व्यक्तीच्या हातात ही दोरी आहे. तर दुसरी व्यक्ती या रेड्याच्या शिंगांना धरून त्याच्या मानेवर बसते. रेड्याच्या शिंगाला व्यक्तीने धरताच रेडा पिसाळतो. तो जोरजोरात  मान हलवतो.तितक्यात सुदैवाने तो माणूस रेड्यावर बसण्यात यशस्वी होतो. त्यानंतर मात्र रेडा त्या व्यक्तीला पाडण्याचा प्रयत्न करतो. आपली मान, डोकं, शिंगं जोरजोरात हलवतो. पण व्यक्ती त्या रेड्याची दोन्ही शिंग घट्ट धरून त्यावर बसून राहते.

    आयपीएस रुपिन शर्मा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून रेड्यावर बसलेल्या माणसाचं कौतुक केलं आहे.