ice cycling

द क्यू नावाच्या एका प्रोडक्ट इंजिनियरने बर्फात सायकल(ice cycle) चालवण्यासाठी एकदम भन्नाट कल्पना शोधली आहे. या पठ्ठ्याने बर्फात सायकल चालवता यावी म्हणून सायकलच्या चाकांच्या जागी गोलाकार ब्लेड(blade used as wheels for cycle) लावले आहेत.

    जगातील अनेक ठिकाणी शून्याच्या खाली पारा गेल्यानंतर सायकल चालवणं हे सायकल(cycle) प्रेमींसाठी आव्हान असतं.  मात्र द क्यू नावाच्या एका प्रोडक्ट इंजिनियरने बर्फात सायकल(ice cycle) चालवण्यासाठी एकदम भन्नाट कल्पना शोधली आहे. या पठ्ठ्याने बर्फात सायकल चालवता यावी म्हणून सायकलच्या चाकांच्या जागी गोलाकार ब्लेड(blade used as wheels for cycle) लावले आहेत. या सायकलला आइससायकल असं नाव देण्यात आलं आहे.

    या तरुणाने आपल्या सायकलची चाकं काढून त्याजागी स्टीलच्या डिस्क लावून डिस्कच्या कडा त्रिकोणी कापून त्यांना ब्लेडसारखा आकार दिला आहे. डिस्कना धार करण्यात आल्याने त्या एखाद्या कटरच्या ब्लेडप्रमाणेच काम करतात. पहिल्यांदा तो या डिस्क लावून गोठलेल्या तलावावर सायकल चालावायला गेला तेव्हा ब्लेडने बर्फाचा पृष्ठभाग कापून निघाला आणि सायकल चावणं त्याला जमलं नाही. त्यानंतर त्याने तंत्रज्ञानाचा वापर करुन या ब्लेडच्या बाहेरील बाजूस धातूची आणखीन एक पट्टी लवली आणि यावेळी त्याला यश आलं.

    या सायकलचा व्हिडिओ युट्यूबवर पोस्ट करण्यात आला आहे. ही सायकल अनेकांना आवडली असून या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया पाहायाला मिळत आहेत.