अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, पोलिसांसह अनेकजण मृत्युमुखी

सोमवारी अमेरिकेतील कोलोरॅडो भागात अचानकपणे एका सशस्त्र व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. यावेळी या दुकानात गर्दी होती आणि अनेकजण या गोळीबारात जखमी झाल्याचं चित्र सोमवारी दिसत होतं. मात्र यातील अनेकांना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या काही पोलिसांनाही आपले प्राण गमवावे लागले. 

    अमेरिकेत झालेल्या गोळीबारात अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेत. एका किराणा मालाच्या दुकानात घुसलेल्या सशस्त्र व्यक्तीने अचानक गोळीबार सुरू केला आणि अमेरिकेतील ्कोलोरॅडो भागात खळबळ उडाली.

    सोमवारी अमेरिकेतील कोलोरॅडो भागात अचानकपणे एका सशस्त्र व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. यावेळी या दुकानात गर्दी होती आणि अनेकजण या गोळीबारात जखमी झाल्याचं चित्र सोमवारी दिसत होतं. मात्र यातील अनेकांना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या काही पोलिसांनाही आपले प्राण गमवावे लागले.

    या हल्लेखोरोला पकडण्यात पोलिसांना यश आलंय. हल्लेखोरदेखील यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती बोलोरॅडो प्रशासनानं दिलीय. आतापर्यत एकूण १० जणांचा यात बळी गेला असून अनेकजण गंभीर जखमी आहेत.त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलीय.

    दरम्यान, या माथेफिरूने केलेला हल्ला होता की यामागे काही दहशतवादी घातपाताचा हेतू होता, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. लवकरच या प्रकरणातील धागेदोरे समोर येतील, असं सांगितलं जातंय. अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्विकारलेली नाही.