sand storm in china

चीनमध्ये धूळ आणि वाळूचे वादळ (sand storm in china)येणे तसे नवीन नाही.मात्र सध्या आलेले वादळ हे दशकातील सर्वात वाईट वादळ असल्याची माहिती मिळाली आहे.या वादळामुळे जपानचा उत्तर भागही प्रभावित होत आहे.

    बीजिंग: चीनमध्ये सध्या धुळीचे वादळ आले आहे. याच कारणामुळे चीनमधील अनेक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.भयानक अशा या धुळीच्या वादळामुळे चीनमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रोजचे व्यवहार ठप्प झाले आहेत. धूळ आणि वाळूच्या वादळामुळे चीनमधील साधारण ४०० फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत.

    चीनमध्ये धूळ आणि वाळूचे वादळ येणे तसे नवीन नाही.मात्र सध्या आलेले वादळ हे दशकातील सर्वात वाईट वादळ असल्याची माहिती मिळाली आहे.या वादळामुळे जपानचा उत्तर भागही प्रभावित होत आहे.

    चीनमध्ये अशा वादळांविरोधात लढण्यासाठी आणि वादळाची तीव्रता कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आले आहेत. तसेच अन्य उपायही करण्यात आले आहे. मात्र मानवी कृतींमुळे पर्यावरणात अनेक बदल होत आहेत. धुळीच्या वादळाचा १२ प्रांतांना फटका बसण्याची शक्यता आहे.