फोटो सौजन्य : Twitter
फोटो सौजन्य : Twitter

त्यांनी राहायला आल्यानंतर १ महिन्याने घराच्या मालकाला छतातून गळती होत असल्याचे सांगितले होते. तथापि, घरमालकाने या मुद्द्याकडे कधीच लक्ष दिले नव्हते आणि अनेक महिन्यांनंतर छत कोसळले आणि त्यातून कमीत कमी चार रॅट जातीचे साप बाहेर निघत असल्याचे दिसले. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

    अमेरिका : सोशल मीडिया (Social Media) वर हैराण करणारा एक फोटो व्हायरल होतो आहे. हे प्रकरण अमेरिकेतील (America) आहे. येथे एका घराच्या छतातून (Roof) साप (Snake) पडत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. यानंतर सर्व लोकांनी हे फोटो (Photo) पाहिल्यानंतर तेही हैराण झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, एका कुटुंबियांच्या नवीन घराचे छत कोसळल्याने सर्वजण घाबरले खरे पण सर्वाधिक हैराण तेव्हा झाले की, त्या छतात सापांचं अख्खं कुटुंब सापडलं आहे. या घरात एक व्यक्ती आपली पत्नी सुझेन आणि त्याची १३ वर्षांची सावत्र मुलगी सोबत राहते अशी माहिती मिळाली आहे.

    त्यांनी राहायला आल्यानंतर १ महिन्याने घराच्या मालकाला छतातून गळती होत असल्याचे सांगितले होते. तथापि, घरमालकाने या मुद्द्याकडे कधीच लक्ष दिले नव्हते आणि अनेक महिन्यांनंतर छत कोसळले आणि त्यातून कमीत कमी चार रॅट प्रजातीचे साप बाहेर निघत असल्याचे दिसले. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो ट्विटरवर Bliss ZechmanNC9 नावाच्या ट्विटर युझरने शेअर केला आणि लिहिले, “Snakes In The Roof!” हॅरी पुगलीस (Harry Pugliese) यांच्या मते फेब्रुवारीपासून ईस्ट विलानो स्ट्रीटवर या घरात ही समस्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे पण घरमालकाने या समस्येकडे दुर्लक्षच केले आहे.

    जेव्हा हॅरीने प्राण्यांच्या संस्थेला फोन केला, तेव्हा त्यांनी सांगितले की, छत पाडण्यासाठी आणि चारही सापांना मुक्त करण्यासाठी घरमालकाची परवानगी घ्यावी लागेल. या घरमालकाला याबाबत काहीही करायचं नव्हतं असं पुगलीस यांनी सांगितलं.

    many snakes come out of the roof of a house in america family shocked know the whole matter