एकत्र राहण्यासाठी लग्नाची गरज नाही; मलाला युसूफजईच्या वक्तव्याने पाकिस्तानमध्ये खळबळ

मूळची पाकिस्तानची असलेली मलाला युसूफजई यांना शांततेचा नोबल पुरस्कार प्राप्त आहे. सध्या त्या लंडनमध्ये वास्तव्यास असून ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवीधर झाल्या आहेत.   

    लंडन.  नोबेल पारितोषिक विजेत्या मलाला युसूफझईयांनी ब्रिटनमधील प्रसिद्ध नियतकालिक व्होग यांना देण्यात आलेल्या मुलाखतीची सध्या जगभरात चर्चा आहे. एखाद्या स्त्री आणि पुरुषाला एकत्र राहण्यासाठी लग्नाची गरज नसल्याचे मत मलालाने मुलाखतीत मांडले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला असून संपूर्ण देशातून नाराजी व्यक्त होत आहे.

    मलाला या मुलाखतीत म्हणाली की,  अजून-ही लोक अजूनही लग्न का करतात हे मला  समजत नाही? तुम्हाला जोडीदार किंवा जीवनसाथी हवी असेल तर त्यासाठी कागदावर स्वाक्षर्‍याची काय गरज आहे? ही भागीदारी का असू शकत नाही का?
    असा प्रश्न तिने विचारला.  मलालाच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानमध्ये संताप व्यक्त होत आहे.

    मूळची पाकिस्तानची असलेली मलाला युसूफजई यांना शांततेचा नोबल पुरस्कार प्राप्त आहे. सध्या त्या लंडनमध्ये वास्तव्यास असून ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवीधर झाल्या आहेत.