donald trump

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या वादग्रस्त विधानांनी कायमच चर्चेत असतात. आता त्यांनी मास्क घालणारे लोक कायमच कोरोनाग्रस्त असतात, असे नवे वक्तव्य केले आहे. त्यांनी हे वक्तव्य मियामी या ठिकाणी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केले. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीलाही काही दिवसांपूर्वीच कोरोनाची बाधा झाली होती.

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या वादग्रस्त विधानांनी कायमच चर्चेत असतात. आता त्यांनी मास्क घालणारे लोक कायमच कोरोनाग्रस्त असतात, असे नवे वक्तव्य केले आहे. त्यांनी हे वक्तव्य मियामी या ठिकाणी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केले. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीलाही काही दिवसांपूर्वीच कोरोनाची बाधा झाली होती. यातून ते सुखरुप बाहेरही आले. व्हाइट हाउसमध्ये २६ सप्टेंबरला एक कार्यक्रम झाला होता. ट्रम्प यांना कोरोना या कार्यक्रमात आलेल्या लोकांमुळे झाल्याचे म्हटले जात आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या बहुतांश लोकांनी मास्क लावले नव्हते. असे असतानाही आता मास्क घालणाऱ्यांबाबत ट्रम्प यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी २६ सप्टेंबरच्या कार्यक्रमानंतरच पॉझिटिव्ह आली होती. याबाबत जेव्हा त्यांना मियामी येथील कार्यक्रमात विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की सतत मास्क घालणारे लोक कोरोनाग्रस्त होतात. अद्याप कोणत्याही अधिकृत वैद्यकिय संस्थेने पुष्टी केलेली नाही. दरम्यान, सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केल्याचे दिसून येत आहे. याआधीही कोरोनाबाबत त्यांनी अनेक वक्तव्ये केली आहेत. हा चायनीज व्हायरस असल्याचेही वक्तव्य त्यांनी जानेवारी महिन्यात केले होते. आता सतत मास्क घालणारे लोक कोरोनाबाधित असतात, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.