असं झालं तर मेहुल चोक्सीचा भारताला ताबा मिळणार, अन्यथा चोक्सी जाऊ शकतो अँटिगाला, अशी आहे कायद्यात तरतूद

जर चोक्सी हा त्याच्या मर्जीने डॉमनिकात आल्याचं सिद्ध झालं, तर त्याचा ताबा भारताला मिळू शकतो, असं मत सीबीआयचे माजी संचालक एपी सिंग यांनी व्यक्त केलंय. मात्र चोक्सीचं अपहरण करून किंवा त्याला जबरदस्तीने डॉमनिकात आणल्याचं सिद्ध झालं, तर मात्र डॉमनिकाचं न्यायालय वेगळा निर्णय देऊ शकतं, असं सिंग यांनी म्हटलंय. 

    पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधींचा चुना लावून पळून गेलेला व्यापारी मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. चोक्सी सध्या डॉमनिकामध्ये असून त्याचा ताबा मिळवण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र चोक्सीचा ताबा भारताला मिळेल का, याबाबत दोन शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

    जर चोक्सी हा त्याच्या मर्जीने डॉमनिकात आल्याचं सिद्ध झालं, तर त्याचा ताबा भारताला मिळू शकतो, असं मत सीबीआयचे माजी संचालक एपी सिंग यांनी व्यक्त केलंय. मात्र चोक्सीचं अपहरण करून किंवा त्याला जबरदस्तीने डॉमनिकात आणल्याचं सिद्ध झालं, तर मात्र डॉमनिकाचं न्यायालय वेगळा निर्णय देऊ शकतं, असं सिंग यांनी म्हटलंय.

    जर मेहुल चोक्सीला किडनॅप करून डॉमनिकात आणल्याचं सिद्ध झालं, तर न्यायालय त्याला त्याच्या मूळ देशात परत पाठवण्याचा निर्णय देऊ शकतं. कायदेशीररित्या मेहुल चोक्सीचा मूळ देश आहे अंटिग्वा. त्यामुळे भारताच्या ताब्यात न देता चोक्सीला अँटिग्वाला धाडलं जाऊ शकतं, अशी भीती सिंग यांनी व्यक्त केलीय.

    कायदेशीररित्या डॉमनिकात चोक्सीला कुठलेही मुलभूत अधिकार प्राप्त होत नाहीत. त्यामुळे त्याला भारताच्या ताब्यात द्यायला कुठलीही तांत्रिक अडचण नाही. चोक्सीविरोधात रेड कॉर्नर नोटीस असल्यामुळे त्याचा ताबा मिळवण्याचा भारताचा मार्ग अधिक सोपा आहे. मात्र केवळ अपहरणाच्या मुद्द्यावरून भारताची प्रतीक्षा लांबू शकते, अशी भीती सिंग यांनी व्यक्त केलीय.