माझ्या नवऱ्याचा जीवाला धोका, होऊ शकते हत्या – मेहुल चोक्सीच्या पत्नीचा दावा

डोमिनिका देशातील समुद्रकिनारी मेहुल चोक्सीसोबत दिसलेल्या एका तरुणीबाबत चर्चा सुरू झाली आहे. ही तरुणी नेमकी कोण याबाबत खुलासा करत असताना मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सीने (Preeti Choksi interview)  खळबळजनक दावा केला आहे.

    नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार ५०० कोटी रुपयांचा घोटाळा करून परदेशात पळून गेलेल्या(PNB Scam) हिरा व्यापारी मेहुल चोक्सीला (Mehul Choksi) भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अलिकडेच मेहुल चोक्सी याला डोमिनिका या देशात पळून जाताना पकडलं आहे. पण डोमिनिका देशातील समुद्रकिनारी मेहुल चोक्सीसोबत दिसलेल्या एका तरुणीबाबत चर्चा सुरू झाली आहे. ही तरुणी नेमकी कोण याबाबत खुलासा करत असताना मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सीने (Preeti Choksi interview)  खळबळजनक दावा केला आहे.

    मेहुल चोक्सीच्या जीवाला धोका असून त्याची कधीही हत्या होऊ शकते, असा दावा पत्नी प्रीती चोक्सी हिच्याकडून करण्यात आला आहे. प्रीती चोक्सी यांनी सांगितलं की, २३ मेच्या रात्री मेहुल चोक्सी जेवण करण्यासाठी बाहेर पडल्यानंतर परत आलेच नाहीत. मेहुल चोक्सी गायब झाल्यानंतर काही वेळातच एका सल्लागाराला आणि स्वयंपाकीला मेहुलला शोधायला समुद्र किनारी पाठवलं होतं. पण त्यांना त्याठिकाणी काहीही पुरावा सापडला नाही. त्यामुळे पोलिसांची मदत घ्यावी लागली.

    दरम्यान मेहुल चोक्सीसोबत समुद्र किनाऱ्यावर आढळलेल्या संदिग्ध तरुणीबाबत (बारबरा जैबरिका) विचारलं असता, प्रीती चोक्सी यांनी सांगितलं की, “मी जैबरिकाला ओळखते. ती गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अँटिग्वाला आली होती. बेटावरील आमच्या दुसऱ्या घरातही ती आली होती. तेथील एका शेफसोबत तिची मैत्रीही झाली होती. बारबरा जशी दिसते तशी अजिबात नाही.” असं सांगत असताना त्यांनी मेहुल चोक्सीच्या जीवाला धोका असून त्याची हत्या होऊ शकते, असंही सांगितलं आहे.

    प्रीती चोक्सी यांनी मुलाखतीत पुढे सांगितले की, “माध्यमांतून चोक्सी फरार झाल्याच्या कथा बनवल्या जात आहेत. यामध्ये काहीही तथ्य नाही. भारतीय राज्यघटनेच्या कलम ९ नुसार माझे पती भारतीय नागरिक नाहीत. त्यांना २०१७ मध्ये अँटिग्वाचं नागरिकत्व मिळालं आहे. त्यामुळे अँटिग्वा ही त्याच्यासाठी सर्वात सुरक्षित जागा आहे. असं असताना तो या देशातून फरार होऊ शकत नाही.