Millionaires live in luxury cars; No one is poor but homeless

यूरोपीय देश मोनाकोला करोडपतींचा देश म्हणून ओळखल्या जाते. याचे कारण येथील श्रीमंती आहे. येथे प्रत्येक 4 मधून एक व्यक्ती करोडपती आहे. करोडपती असूनही येथील श्रीमंत व्यक्ती एका गंभीर समस्येचा सामना करीत आहेत. त्यांच्याजवळ राहण्यासाठी जागाच नाही. एवढेच नव्हे तर अधिकतर श्रीमंतांना आपली कार किंवा डोरमेट्रीमध्ये राहावे लागत आहे. आता मोनाकोची सरकार लोकांना राहण्यासाठी समुद्रात इमारती बांधणार असल्याचे समजते.

   मोनाकोला : यूरोपीय देश मोनाकोला करोडपतींचा देश म्हणून ओळखल्या जाते. याचे कारण येथील श्रीमंती आहे. येथे प्रत्येक 4 मधून एक व्यक्ती करोडपती आहे. करोडपती असूनही येथील श्रीमंत व्यक्ती एका गंभीर समस्येचा सामना करीत आहेत. त्यांच्याजवळ राहण्यासाठी जागाच नाही. एवढेच नव्हे तर अधिकतर श्रीमंतांना आपली कार किंवा डोरमेट्रीमध्ये राहावे लागत आहे. आता मोनाकोची सरकार लोकांना राहण्यासाठी समुद्रात इमारती बांधणार असल्याचे समजते.

  जगातील दुसरा छोटा देश

  मोनाको फ्रांसच्या भूमध्य सागरी किनाऱ्यावर वसलेला देश आहे. जो केवळ 2.02 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. म्हणजेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा देश न्यूयॉर्क सिटीच्या सेंट्रल पार्कपेक्षाही कमी आहे. जो 3.41 किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. जागेमुळे याला जगातील सर्वात छोटा देश मानल्या जातो. सर्वात छोटा देश वेटिकन सिटी आहे. एवढ्या कमी जागेवरही मोनाकोमध्ये 38,000 पेक्षा काही अधिक लोक वसलेले आहेत. हेच कारण आहे की, येथे राहण्यासाठी जागा कमी पडते. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, येथे 38,000 च्या लोकसंख्येवर 3,000 च्या जवळपास लोक घरांशिवाय राहत आहेत. अशातच ते मोठ- मोठ्या कार्स किंवा सार्वजनिक ठिकाणी राहतात.

  पाण्यात बनविणार घरे

  जमिनीची कमतरता लक्षात घेता, मोनाकोची सरकार मार्ग शोधत आहे. समुद्रात ऊंच इमारती बांधण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. पर्वतावर घर बनविणे, स्कायस्क्रॅपर बनविणे आणि जमिनीच्या आत बांधकामासारखे सर्व उपाय सरकारने आधीच केले आहे. आता तेथेही जागा संपल्यामुळे पाण्यात घर बनविले जातील. जवळपास 2 वर्षांपूर्वीच यासाठी होकार आला आणि काम सुरु झाले आहे. सरकारने पाणी आणि याच्या जवळपास घर बांधकामाच्या या प्रकल्पाला ऑफशोर अर्बन एक्सटेंशन प्रोजेक्ट नाव दिले आहे. 2026 पर्यंत हे प्रकल्प पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. मोनाकोमध्ये किती अंतरावर इमारतींचे बांधकाम होऊ शकेल, याबाबत माहिती मिळविता येईल. यात 120 पेक्षा अधिक घरे, पार्क आणि दुकाने बनविली जातील.

  गरीबी नाही

  घरांसाठी प्रतीक्षेत असलेला हा देश अधिक श्रीमंत आहे. येथे गरीबी नाही. एवढेच नव्हे तर सीआयए वर्ल्ड फॅक्टबुकमध्येही या देशात गरीबीसाठी ‘नॉट एप्लिकेबल’ असे लिहिले आहे. याचे एक कारण असेही आहे, येथे कुठलेही इनकम टॅक्स नाही. स्वत: सरकारलाही अंदाजा नाही की, येथील लोकांजवळ किती पैसा आहे. येथील प्रती व्यक्ती जीडीपी, जो 165,420 डॉलर आहे. येथे जवळपास 38000 लोकसंख्येतून केवळ 9326 लोकच मोनाकोचे मूळ रहिवाशी आहेत. इतर लोकसंख्या दुसऱ्या देशांतून येऊन वसलेल्या श्रीमंतांची आहे. येथे फ्रान्स, इटली, यूके, स्वितरझरलँड, जर्मनी आणि अमेरिकेतून लोक आले आहेत. जे की, जीवनशैलीत फिट बसतात. येथे असे श्रीमंत लोक येतात, जे टॅक्स वाचवू इच्छितात. ते मोनाकोमध्येच राहत जगभरात व्यवसाय करतात. ज्याचे त्यांना टॅक्सही द्यावे लागत नाही.