‘ट्विटर’वर मोदींचा डंका; बायडेन, इम्रानखान यांना टाकले मागे

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैयक्तिक अकाउंटचे 88.7 मिलियन म्हणजेच 8 कोटी 87 लाख फॉलोअर्स होते. ट्रम्प यांचे सर्वाधिक फॉलोअर्स असताना जगात सोशल मीडियावर सक्रिय नेत्यांमध्ये मोदी दुसऱ्या स्थानावर होते. मोदींच्या अकाउंटच्या फॉलोअरर्सची संख्या 64.7 मिलियन म्हणजेच 6 कोटी 47 लाख इतकी होती. ती आता 7 कोटींवर पोहोचली आहे. याआधी 2020 मध्ये पंतप्रधान मोदी चर्चेत होते. ट्विटर, यूट्युब, गुगल सर्चमध्ये ट्रेंडिग चार्टमध्ये ते आघाडीवर होते. एका अभ्यासात त्यावेळी मोदींची ब्रँड व्हॅल्यू जवळपास 336 कोटी असल्याचे म्हटले होते. सोशल मीडियावर असलेली एंगेजमेंट आणि फॉलोअर्सची संख्या यावरून ब्रँड व्हॅल्यू ठरवण्यात येते.

    दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्सच्या बाबतीत मोदींनी विक्रम केला आहे. जगातील नेत्यांमध्ये ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांमध्ये मोदी पहिल्या क्रमांकावर पोहोचले असून त्यांचे ट्विटरवर 7 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे फॉलोअर्सच्या बाबतीत अव्वल आहेत. त्याआधी ट्रम्पच याबाबतीत आघाडीवर होते.

    अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैयक्तिक अकाउंटचे 88.7 मिलियन म्हणजेच 8 कोटी 87 लाख फॉलोअर्स होते. ट्रम्प यांचे सर्वाधिक फॉलोअर्स असताना जगात सोशल मीडियावर सक्रिय नेत्यांमध्ये मोदी दुसऱ्या स्थानावर होते. मोदींच्या अकाउंटच्या फॉलोअरर्सची संख्या 64.7 मिलियन म्हणजेच 6 कोटी 47 लाख इतकी होती. ती आता 7 कोटींवर पोहोचली आहे. याआधी 2020 मध्ये पंतप्रधान मोदी चर्चेत होते. ट्विटर, यूट्युब, गुगल सर्चमध्ये ट्रेंडिग चार्टमध्ये ते आघाडीवर होते. एका अभ्यासात त्यावेळी मोदींची ब्रँड व्हॅल्यू जवळपास 336 कोटी असल्याचे म्हटले होते. सोशल मीडियावर असलेली एंगेजमेंट आणि फॉलोअर्सची संख्या यावरून ब्रँड व्हॅल्यू ठरवण्यात येते.

    पहिल्या क्रमांकावर मोदी तर दुसऱ्या क्रमांकावर अमिताभ बच्चन आहेत. त्यांच्या ट्विटर अकाऊंटला 4.58 कोटींहून अधिक लोक फॉलो करतात. बीग बी अनेकदा आपल्या मनातल्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. काही फोटो, संदेश यांसहीत आपले पिता कवी हरिवंशराय बच्चन यांच्या कविताही त्यांनी अनेकदा सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी शेअर केल्या आहेत. ट्विटरवर तिसऱ्या क्रमांकावर कुणी व्यक्ती नाही तर पंतप्रधान कार्यालयाचे अकाऊंट आहे तर या यादीत चौथ्या क्रमांकावर क्रिकेटर आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आहे.