delta coronavirus

ता आलेल्या नव्या व्हेरिअंटसाठी आता वेगळी औषधोपचार पद्धती अवलंबावी लागेल, असं शआस्त्रज्ञांना वाटतंय, कारण हा व्हेरिअंट शरीराच्या अँटिबॉडीज तयार करण्याच्या क्षमतेवरच हल्ला करतो, असं दिसून आलंय. 

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता ओसरू लागलाय. तिसऱ्या लाटेसाठीची तयारीही सरकारी पातळीवर सुरू आहे. मात्र या सगळ्यात आता आणखी धक्कादायक बातमी आलीय. कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिअंट सध्या भारतात आलाय आणि हा व्हेरिअंट आतापर्यंतचा सर्वात भयंकर व्हेरिअंट असल्याचं शास्त्रज्ञ सांगतायत.

    यापूर्वी भारतात आलेला डेल्टा व्हेरिअंट रुग्णांच्या प्रकृतीवर परिणाम करायचा, मात्र औषधोपचारांनी त्यावर मात करता येणं शक्य होतं. कारण योग्य उपचारांनी शरीरातील अँटिबॉडीज वाढवून या कोरोनाच्या डेल्टा व्हायरसवर मात करणं शक्य व्हायचं. मात्र आता आलेल्या नव्या व्हेरिअंटसाठी आता वेगळी औषधोपचार पद्धती अवलंबावी लागेल, असं शास्त्रज्ञांना वाटतंय, कारण हा व्हेरिअंट शरीराच्या अँटिबॉडीज तयार करण्याच्या क्षमतेवरच हल्ला करतो, असं दिसून आलंय.

    K417N असं या नव्या व्हेरिअंटचं नाव आहे. भारतात आतापर्यंत या विषाणूचा प्रभाव झाल्याच्या फारशा घटना घडलेल्या नसल्या, तरी सध्याचा डेल्टा व्हेरिअंट हाच काही काळाने K417N चं रुप घेऊ शकतो, असं शास्त्रज्ञ सांगतायत. व्हायरसच्या याच व्हेरिअंटला डेल्टा प्लस असंही नाव देण्यात आलंय. या नव्या व्हेरिअंटपासून सावधान राहण्याचा सल्ला डॉक्टर देतायत.

    हा व्हायरस रोगप्रतिकारक शक्तीवरच पहिला हल्ला करत असल्यामुळे विषाणूवर मात करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अँटिबॉडिज तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. जर अँटिबॉडिजच तयार झाल्या नाहीत, तर विषाणूला मात कशी देणार, हा प्रश्न निर्माण होतो. अशा रुग्णांवर कसे उपचार करायचे, याचं संशोधन सध्या ब्रिटनमध्ये सुरू आहे.