More than 200 people were injured in an accident involving an LRT train in Kuala Lumpur, the capital of Malaysia

मलेशियाची राजधानी असलेल्या क्वालालंपूरमध्ये एलआरटी ट्रेनमध्ये झालेल्या एका अपघातात 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. प्रवाशांना घेऊन निघालेली एक एलआरटी ट्रेन दुसऱ्या रिकाम्या एलआरटी ट्रेनला धडकल्याने हा अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती मंत्री अन्नुअर मुसा यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

    क्वालालंपूर : मलेशियाची राजधानी असलेल्या क्वालालंपूरमध्ये एलआरटी ट्रेनमध्ये झालेल्या एका अपघातात 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली.

    प्रवाशांना घेऊन निघालेली एक एलआरटी ट्रेन दुसऱ्या रिकाम्या एलआरटी ट्रेनला धडकल्याने हा अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती मंत्री अन्नुअर मुसा यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. प्रवाशांनी भरलेली ट्रेन अम्पांग स्टेशनहून निघाली होती.

    केएलसीसी बिल्डिंगच्या खाली ही घटना घडली. या घटनेत कुणी मृत पावल्याची बातमी समोर आली नाही, पण 213 नागरिक जखमी झाले आहेत. 64 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे तर 3 जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.