Masood Azhar

आतंकवादी संघटनांना आर्थिक मदत करत त्याचे पालनपोषण केल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय संघटना एफएटीएफने पाकिस्तानला यापूर्वीच ग्रे लिस्टमध्ये टाकले आहे. पाकिस्तानचा दुतोंडीपणा चव्हाट्यावर, चीनसोबत संगनमत करून तालिबानला मदत अलीकडील काही काळापासून पाकिस्तान ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. पण मसूद अझहर पाकिस्तानात लपून बसलेली माहिती समोर आल्यानंतर, पाकिस्तानचा दुतोंडी पणाचा बुरखा पुन्हा फाटला आहे.

    दिल्ली : भारतातील मोस्ट वॉन्टेट आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काळ्या यादीत टाकलेला आतंकवादी मसूद अझहर पाकिस्तानमध्येच लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचे वृत्त दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. मसूद अझहर हा पाकिस्तानातील बहावलपूर येथे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मसूद अझहरला पाकिस्तानी सैन्यांकडून सुरक्षा पुरवली जात असल्याची माहिती देखील उघड झाली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर पाकिस्तानची नाच्चकी झाली आहे. आता भारत सरकार देखील पाकिस्तानला दणका देण्याच्या तयारीत आहेत.

    खरंतर, आतंकवादी संघटनांना आर्थिक मदत करत त्याचे पालनपोषण केल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय संघटना एफएटीएफने पाकिस्तानला यापूर्वीच ग्रे लिस्टमध्ये टाकले आहे. पाकिस्तानचा दुतोंडीपणा चव्हाट्यावर, चीनसोबत संगनमत करून तालिबानला मदत अलीकडील काही काळापासून पाकिस्तान ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. पण मसूद अझहर पाकिस्तानात लपून बसलेली माहिती समोर आल्यानंतर, पाकिस्तानचा दुतोंडी पणाचा बुरखा पुन्हा फाटला आहे.

    पाकिस्तान आतंकवाद्यांना आश्रय देऊन त्यांचे पालपोषण करत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर पाकिस्तानात लपून बसल्याचे वृत्त समोर आले आहे. कुख्यात आतंकवादी मसूद अझहर आजही पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये सुरक्षितपणे लपून बसला आहे. त्याचा एक अड्डा बहावलपूरमधील उस्मान-ओ-अली मशिदीजवळ आहे तर दुसरा अड्डा सुभान अल्लाह येथील जामिया मशीदीजवळ आहे.

    आता भारत सरकार पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर दणका देण्याच्या तयारीत आहे. आतंकवाद्यांना आसरा दिल्याप्रकरणी पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी भारत हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर लावून धरणार आहे. त्यामुळे पाकिस्तान आता ग्रे लिस्टमध्येच सडण्याची शक्यता आहे.