Mulla Hassan Akhund will lead the Taliban government

‘द न्यूज’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. “हिबतुल्ला अखुंजादाने स्वतः मुल्ला मोहम्मद हसन अखुंदाचं नाव रईस-ए-जम्हूर, रईस-उल-वजारा या अफगाणिस्तानच्या प्रमुख पदासाठी सुचवल असल्याचे समजते. “मुल्ला बरादर अखुंद आणि मुल्ला अब्दुस सलाम त्यांचे सहाय्यक म्हणून काम करतील. अनेक तालिबानी नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर सर्वांनी मुल्ला मोहम्मद हसन अखुंदच्या नावावर सहमती दाखवली असल्याचे तालिबानच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगीतले.

  काबुल: अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर तालिबानच्या सरकार स्थापनेच्या हरालचालींना वेग आला. तालिबान आणि अफगाणिस्तानच्या इतर नेत्यांमध्ये सरकार स्थापनेच्या सूत्रावर सहमती झाली आहे. मात्र, अफगाणिस्तानात तालिबान सरकार स्थापनेत धक्कादायक ट्विस्ट आला आहे. हे नवं सरकार तालिबानचा नेता मुल्ला बरादरच्या नेतृत्वात नव्हे तर मुल्ला हसन अखुंदच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार आहे. 8 सप्टेंबर रोजी नव्या तालिबान सरकारची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  एका अधिकाऱ्याने सांगितले की, तालिबान आणि इतर अफगाण नेते यांच्यात तालिबानच्या सर्वोच्च आध्यात्मिक नेत्याच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार आणि मंत्रिमंडळाच्या निर्मितीवर एकमत झाले आहे. यानुसार मुल्ला हसन अखुंद हे सरकारचा मुख्य चेहरा असतील तर हैबतुल्लाह अखुंदजादा गव्हर्निंग कौन्सिलचे प्रमुख असतील.

  ‘द न्यूज’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. “हिबतुल्ला अखुंजादाने स्वतः मुल्ला मोहम्मद हसन अखुंदाचं नाव रईस-ए-जम्हूर, रईस-उल-वजारा या अफगाणिस्तानच्या प्रमुख पदासाठी सुचवल असल्याचे समजते. “मुल्ला बरादर अखुंद आणि मुल्ला अब्दुस सलाम त्यांचे सहाय्यक म्हणून काम करतील. अनेक तालिबानी नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर सर्वांनी मुल्ला मोहम्मद हसन अखुंदच्या नावावर सहमती दाखवली असल्याचे तालिबानच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगीतले.

  अमेरिकन सैन्य माघारीनंतर तालिबानमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्यापुढील आव्हानेही बरीच आहेत. त्यांना आता कार्यरत सरकार स्थापन करायचे आहे. अमेरिकेने मदत कपात केल्यानंतर आणि वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवल्यानंतर नवीन तालिबान नेत्यांना आर्थिक संकट टाळावे लागेल. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांशी असलेले गृहयुद्ध टाळावे लागेल. अखुंदजादा सध्या कंधारमध्ये आहेत, जिथे त्यांनी तालिबान आणि इतर अफगाण नेत्यांसह तीन दिवसीय परिषदेचे नेतृत्व केले.

  अफगाणिस्तानमध्ये तालिबानने मिळवलेल्या विजयासंदर्भात ‘अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेने तालिबानचे अभिनंदन केले आहे. इतकेच नाही तर ‘अल-कायदा’ने काश्मीर आणि अन्य काथकथित इस्लामिक भूभाग हा इस्लामच्या शत्रूंच्या ताब्यातून मुक्त करण्यासंदर्भात भाष्य केले आहे. तालिबानने अफगाणिस्तानला पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा केल्यानंतर काही तासांमध्येच ‘अल-कायदा’ने त्यांचे अभिनंदन करणारा संदेश जारी केला.

  अल-कायदाने अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्याने घेतलेली माघार घेण्याचा संबंध हा कथाकथित इस्लामिक प्रदेशांना स्वातंत्र्य मिळवण्याशी जोडला. लेवंत, सोमाविया आणि येमेनलाही मुक्त करण्याबद्दल या दहशतवादी संघटनेने तालिबानचे अभिनंदन करताना भाष्य केले आहे. ‘अफगाणिस्तानमध्ये अल्लाहने मिळवून दिलेल्या विजयाबद्दल इस्लामिक उम्माचे अभिनंदन’ या मथळ्याखाली अल-कायदाने संदेश जारी केला.