धर्मद्वेषातून कॅनडामध्ये वाहनाखाली चिरडून मुस्लिम कुटुंबाची हत्या ; घटनेत ४ मृत्यूमुखी १ गंभीर जखमी

ही घटना पूर्वनियोजित आणि द्वेषापासून प्रेरित असलेल्या दृष्टीकोनातून केली असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले असून,  मुस्लिम असल्यानं कुटुंबाला टार्गेट करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र आरोपीची कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा द्वेषसंबंधी गटाचा तो सदस्य नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

    इस्लाम धर्माच्या द्वेषातून कॅनडामध्ये एका माथेफिरूने मुस्लिम कुटुंबाची वाहनाखाली चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ७४ आणि ४४ वर्षीय महिला. ४६ वर्षीय पुरुष आणि १५ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असून हल्ल्यात नऊ वर्षांचा मुलगा वाचला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माथेफिरूने घटनेवेळी एक पिकअप ट्रक नियम तोडून रस्त्यावर आला आणि मुस्लिम कुटुंबाच्या अंगावर घातला. घटनेनंतर पोलिसांनी २० वर्षीय तरुणाला अटक केली असून त्याच्याविरोधात फर्स्ट डिग्री हत्या आणि एक हत्येचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आरोपी मूळचा लंडनचा स्थानिक आहे.

    ही घटना पूर्वनियोजित आणि द्वेषापासून प्रेरित असलेल्या दृष्टीकोनातून केली असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले असून,  मुस्लिम असल्यानं कुटुंबाला टार्गेट करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र आरोपीची कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा द्वेषसंबंधी गटाचा तो सदस्य नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

    या घटनेची दाखल कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी देखील घेतली असून, याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला असून आपल्या देशात इस्लामविरोधी द्वेषाला कोणतंही स्थान नसल्याचे म्हटले आहे. हा द्वेष कपटीचा आणि तिरस्कार आहे आणि तो थांबलाच पाहिजे,” असंही ते म्हणाले आहेत.

    लंडनचे मेयर होल्डर यांनीदेखील ही भीषण हत्या असल्याचं म्हटलं आहे. एकाच कुटुंबातील तीन पिढ्या गेल्या असल्याचं सांगत होल्डर यांनी घटनेप्रकरणी शोक आणि संताप व्यक्त केला आहे.