पीपीई किट घोटाळा उघड केला म्हणून दक्षिण आफ्रिकेत भारतीय महिलेची हत्या

बबिता यांनी आपल्या मुलीला शाळेतून सोडले आणि त्या पुन्हा घरी आल्या. घरी गाडी पार्क करुन त्या काही वेळ गाडीत बसल्या होत्या. त्याचवेळी काही लोकांनी त्यांना घराबाहेर घेरले. व हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. बबिता देवकरण यांना 12 गोळ्या लागल्या. रुग्णालयात पोहोचल्यावर त्याचा मृत्यू झाला. बबिता देवकरण या गौतेंग प्रांतात आर्थिक प्राधिकरणाच्या महत्त्वाच्या पदावर तैनात होत्या.

    दक्षिण आफ्रिकेचा गौतेंग प्रांत. गेल्या वर्षी कोविड दरम्यान येथे लाखो डॉलर्स किमतीचा पीपीई किट घोटाळा झाला होता. हा घोटाळा उघडकीस आणण्यात भारतीय वंशाच्या महिलेने महत्त्वाची भूमिका बजावली. या महिलेचे नाव आहे बबिता देवकरण. 23 ऑगस्ट रोजी बबिता देवकरण यांची हत्या झाली. ही हत्या त्यांनी पीपीई किट घोटाळा उघडकीस आणल्यामुळे झाल्याचं बोललं जात आहे.

    द टाइम्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, बबिता देवकरन यांची त्यांच्या घराबाहेर हत्या करण्यात आली. 23 ऑगस्ट रोजी सकाळी बबिता यांनी आपल्या मुलीला शाळेतून सोडले आणि त्या पुन्हा घरी आल्या. घरी गाडी पार्क करुन त्या काही वेळ गाडीत बसल्या होत्या. त्याचवेळी काही लोकांनी त्यांना घराबाहेर घेरले. व हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. बबिता देवकरण यांना 12 गोळ्या लागल्या. रुग्णालयात पोहोचल्यावर त्याचा मृत्यू झाला. बबिता देवकरण या गौतेंग प्रांतात आर्थिक प्राधिकरणाच्या महत्त्वाच्या पदावर तैनात होत्या.

    पीटीआय या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, बबिता देवकरण यांच्या हत्येच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली असुन गौतेंग प्रांताचे प्रमुख डेव्हिड माखुरा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

    डेव्हिड माखुरा म्हणाले की, त्यांनी पोलिसांना बबिता यांच्या हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्याचे आदेश दिले होते. बबिता यांनी उघड केलेला हा घोटाळा सुमारे दीड अब्ज रुपयांची असल्याचे सांगितलं जात आहे.