muslim country in indonesia where people is ram devotees
जगातला असा मुस्लिम बहुल देश; येथील अधिकाधिक लोक आहेत रामभक्त

दक्षिण पूर्व आशिया खंडात वसलेल्या इंडोनेशियाची लोकसंख्या जवळपास २३ कोटींच्या घरात आहे. इंडोनेशिया हा जगातला चौथा सर्वाधिक लोकसंख्येचा देश असून सोबतच सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देशही आहे.

इंडोनेशिया एक अशा देश आहे, येथे मुस्लिमांचे प्रमाण अधिक आहे. तथापि, एवढं असूनही इंडोनेशियात परमेश्वर रामासाठी एक विशेष जागा आणि सन्मान आहे. आपल्यालाही हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल की इंडोनेशियात रामकथा म्हणजेच रामायण एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. या देशातले मुस्लिम परमेश्वर रामालाच आपल्या जीवनात आदर्श आणि रामायणच त्यांना अधिक प्रिय आहे.

दक्षिण पूर्व आशिया खंडात वसलेल्या इंडोनेशियाची लोकसंख्या जवळपास २३ कोटींच्या घरात आहे. इंडोनेशिया हा जगातला चौथा सर्वाधिक लोकसंख्येचा देश असून सोबतच सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देशही आहे.

१९७३ साली इंडोनेशिया सरकारने आंतरराष्ट्रीय रामायण संम्मेलनाचे आयोजनही केले होते, ज्याचे नियोजन खूपच अप्रतिम होते. कारण, असं प्रथमच घडलं होतं, कारण एखाद्या मुस्लिम राष्ट्राने पहिल्यांदाच अन्य धर्माच्या धर्मग्रंथाच्या सन्मानार्थ अशा प्रकारचे घोषित रुपातील आयोजन केले होते. मुस्लिम राष्ट्र इंडोनेशियात आजही रामायणाचा एवढा एवढा जबरदस्त पगडा आहे की, देशातल्या अनेक भागांत रामायणाचे अवशेष आणि रामायणातील चित्र दगडांवर कोरलेले सहजच नजरेस पडतात.

तथापि, इंडोनेशिया आणि भारतातल्या रामायणात काहीसा फरकही आहे. भारतात रामाची नगरी अयोध्या म्हणून ओळखली जाते तर इंडोनेशियात तिला योग्या असे संबोधले जाते. या ठिकाणी रामायणाला ककनिन किंवा काकाविन रामायण म्हणून ओळखले जाते. आपल्या देशात प्राचीन सांस्कृतिक रामायण हे महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलं आहे, तर इंडोनेशियात याचे रचनाकार कवी योगेश्वर आहेत.

इंडोनेशियात जे रामायण प्रचलित आहे, तो २६ अध्यायांचा एक विशाल ग्रंथ आहे. या रामायणात परमेश्वर रामाचे पिता दशरथ यांना विश्वरंजन म्हटलं आहे, तसेच त्यांना एक शैवही मानलं आहे. इंडोनेशियातल्या रामायणाचा प्रारंभ परमेश्वर रामजन्माने होतो, तर विश्वामित्र यांच्यासोबत राम आणि लक्ष्मण यांच्या प्रस्थानात समस्त ॠषीगणांकडून मंगलचरण म्हटले जाते आणि दशरथाच्या घरी या ज्येष्ठ पुत्राच्या जन्मासोबतच हिंदेशियाचे वाद्य गामलान वाजविण्यास सुरुवात होते.

गेल्या वर्षी इंडोनेशिया सरकारने भारतात अनेक ठिकाणी इंडोनेशियाच्या रामायणावर आधारित रामलीलेचे आयोजन करण्याची मागणी केली होती. इंडोनेशियाचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री अनीस बास्वेदन भारतात आले होते तेव्हा त्यांनी तत्कालीन भारतीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांची भेट घेतली होती.