Muslim family crushed to death under truck in Canada; 4 killed in brutal incident

कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका ट्रक ड्रायव्हरने मुस्लीम असल्या कारणाने एका कुटुंबाला टार्गेट केले. ही घटना लंडनच्या औंटारियो शहरात रात्री घडली. या घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी एका युवकाला मॉलच्या परिसरातून अटक केली आहे.

    टोरंटो : कॅनडामध्ये मूळचे पाकिस्तानी असलेल्या मुस्लीम कुटुंबाच्या हत्येमुळे संपूर्ण जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. या क्रूर घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून एक जीवन-मृत्यूशी झुंज देत आहे.

    कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका ट्रक ड्रायव्हरने मुस्लीम असल्या कारणाने एका कुटुंबाला टार्गेट केले. ही घटना लंडनच्या औंटारियो शहरात रात्री घडली. या घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी एका युवकाला मॉलच्या परिसरातून अटक केली आहे.

    एका वळणावर या ट्रकचालकाने पीडित कुटुंबाला चिरडले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाश्चिमात्य देशात इस्लामोफोबिया वाढत असल्याचा आरोप केला आहे. मुस्लीम कुटुंबाच्या हत्येनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही इस्लामोफोबियावर निशाणा साधला आहे.

    हे सुद्धा वाचा