‘माझ्या स्वप्नांना माझ्या वडिलांनी मारून टाकले , त्यांना तुरुंगात टाका’ पाॅप स्टार ब्रिटनीची पोस्ट व्हायरल

ब्रिटनीचे वडिल जेमी स्पीअर्स हेच ब्रिटनीच्या आयुष्याचे सर्व निर्णय घेतात. यावरुनच आपले वडिल आपला आर्थिक छळ करत असल्याचं देखील ब्रिटनीने म्हटलं आहे

    नवी दिल्ली: सोशल मीडियावर आपल्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असलेली प्रसिद्ध अमेरिकन पाॅप स्टार ब्रिटनी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. ब्रिटनीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत थेट वडिलांवर निशाणा साधला आहे.

    ‘आपल्या वडिलांनी आपल्या स्वप्नांचा जीव घेतला असला असून , ब्रिटनीचे वडिल जेमी स्पीअर्स हेच ब्रिटनीच्या आयुष्याचे सर्व निर्णय घेतात. यावरुनच आपले वडिल आपला आर्थिक छळ करत असल्याचं देखील ब्रिटनीने म्हटलं आहे. याबाबत कोर्टात याचिका देखील दाखल केली असून माझे वडील घोटाळेखोर असून त्यांना तुरुंगात टाका, अशी विनंती देखील तिने कोर्टात केली आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Britney Spears (@britneyspears)

    ब्रिटनी स्पीअर्स ही अमेरिकन पाॅप स्टार असून तिचं ‘बेबी वन मोर टाईम’ हे गाणं सर्वात जास्त सुपर हिट झालं होतं. तिच्या या इन्स्टाग्रामवरील पोस्टला संमिश्र प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत आहेत.