Nepal on the path to monarchy again; This is the demand of Nepali citizens to become a Hindu nation

रविकुमार रौनियार यांनी नेपाळ हिंदू राष्ट्र व्हावे हीच नेपाळी नागरिकांची मागणी असल्याचे ठाम प्रतिपादन केले. राजकीय पक्ष आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडत नसल्याची टीका करतानाच त्यांनी देशात पुन्हा राजेशाही व्यवस्था पुनर्स्थापित व्हावी अशी मागणी केली.

काठमांडू : नेपाळमधील सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षातील अंतर्गत कलह आणि पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच आता पुन्हा एकदा देशात राजेशाही बहाल करण्यात यावी या मागणीने जोर धरला आहे. गेल्याच आठवड्यात नेपाळमधील पोखरा व बुटवलसारख्या मोठ्या शहरात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी नागरिकांनी नेपाळमध्ये हिंदू राज्याची स्थापना करणारे पृथ्वी नारायण शाह यांचे छायाचित्र घेतले होते. गुरुवारीही महाराजगंज जिल्ह्याच्या सीमेवजळील भैरहवा गावात राजेशाहीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाचे संयोजक रविकुमार रौनियार यांनी नेपाळ हिंदू राष्ट्र व्हावे हीच नेपाळी नागरिकांची मागणी असल्याचे ठाम प्रतिपादन केले. राजकीय पक्ष आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडत नसल्याची टीका करतानाच त्यांनी देशात पुन्हा राजेशाही व्यवस्था पुनर्स्थापित व्हावी अशी मागणी केली. या सभेला रंजन खनाल, मनोज कुमार झा, बलराम शर्मा, गोपालशर्मा, मोहंमद आदींनी संबोधित केले. यावेळी सर्व वक्त्यांनी राजेशाही हीच काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. राजेशाहीची पुनर्स्थापना झाल्यानंतरच देशाचे भले होऊ शकते असेही मत त्यांनी व्यक्त केले. यासाठी संघर्ष करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

राजेशाहीच्या स्थापनेची मागणी करीत आंदोलकांनी मोठ्या संख्येत मोटरसायकल रॅलीही काढली. या रॅलीत राजा आणा, देश वाचवा अशा घोषणाही दिल्या.