भारताच्या लिपुलेखमधील हालचालींवर नेपाळची नजर

भारत (India)आणि चीनमध्ये(china) अनेक महिन्यांपासून तणावाची परिस्थिती आहे. एकिकडे चर्चा सुरु असताना दुसरीकडे चीनी सैन्याच्या कारवायाही सुरु आहेत. मात्र भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करण्याचा चीनचा डाव भारतीय लष्कराने उधळून लावला. त्यानंतर चीनला राग अनावर झाला आहे. असे असताना लिपुलेखमधील (lipulekh) भारताच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे आदेश नेपाळच्या सशस्त्र दलाला(napf) तिथल्या सरकारने दिले आहेत.

लिपुलेख हा भाग उत्तराखंडमध्ये असलेला भारत, नेपाळ (nepal) आणि चीनच्या सीमांना जोडणारा आहे. नेपाळच्या गृह मंत्रालयाने एक आदेश काढला आहे. ज्यात त्यांनी नेपाळ सशस्त्र पोलीस दलाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. हे घडत असतानाच चीनने आपल्या जवानांची संख्या वाढवली आहे. सीमेपासून १० किमी.च्या अंतरावर चीनचे जवान आहेत. याच भागात काही दिवसांपूर्वी रस्ते निर्मितीचे काम सुरु होते. नेपाळने याचा विरोध केला आणि लिपुलेखवर दावा केला. त्यानंतर नेपाळमधील सरकारने लिपुलेख, लिम्पियाधुरा या प्रदेशांचा समावेश करून नवा नकाशा तयार केला. कैलास मानसरोवर(manasarovar) यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी भारताने या ठिकाणी रस्तेनिर्मिती सुरु केली आहे.