नेपाळमधील राजकीय संकट गडद ; ओली-प्रचंड यांच्यातील चर्चा निष्फळ

काठमांडू : नेपाळमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या सचिव मंडळाची शनिवारी झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. बैठकीत पंतप्रदान के.पी. शर्मा ओली आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष पुष्प कमल दहल प्रचंड यांच्यात ४ तास आमोरा-समोर चर्चा झाली, मात्र या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. दोन्ही नेते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे पक्षातील अंतर्गत कलह कायम आहे.

आता स्टँडिंग कमेटीच्या बैठकीसह पक्षाच्या सर्व बैठका काठमांडूच्या धुंबराहीस्थित कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कार्यालयातच होतील, असे पंतप्रधानांच्या बालूवॉटर स्थित सरकारी निवासस्थानी झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले आहे. पक्षाचे प्रवक्ते नारायण काजी श्रेष्ठ यांनी बैठकीनंतर सांगितले की, सचिव मंडळाच्या बैठकीत पक्षातील अंतर्गत वादांवर चर्चा झाली, मात्र त्यावर कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.

एक व्यक्ती एक पद फॉर्म्युल्यामुळे वाद
पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिव मंडळाच्या बैठकीपूर्वी ओली आणि प्रचंड यांच्यात एकांतात चर्चा झाली, मात्र समस्यांवर समाधान झाले नाही. माजी पंतप्रधान प्रचंड, माधवकुमार नेपाल आणि काही वरिष्ठ नेत्यांनी, ओली यांनी पंतप्रधान किंवा पक्षाचे अध्यक्ष यामधून एका पदाचा त्याग करावा, अशी मागणी केली आहे. या मागणीमुळेच सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षात वाद निर्माण झाला आहे. ओलींवर नाराज असलेला पक्षातील एक गट ‘एक व्यक्ती, एक पद’ हा फॉर्म्युला पक्षात लागू करण्यासाठी धडपडत आहे, तर ओलींना मात्र हा फॉर्म्युला मान्य नसल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.