Alexander, the Mughals, the British, the United States after the Soviet Union; ‘Cemetery of Empires’ is a bloody history of Afghanistan and the Taliban

अफगाणिस्तानात तालिबान आणि इसिसमध्ये जोरदार चमकक उडाली(Clashes between Taliban and ISIS). अफगाणिस्तानच्या उत्तर परवान प्रांताची राजधानी छारीकारमध्ये तालिबान आणि इसिस यांच्यात झालेल्या चकमकीत किमान 20 तालिबानी ठार झाल्याची माहिती आहे. तालिबान आणि इसिसच्या दहशतवाद्यांमध्ये गोळीबार आणि बॉम्ब हल्ले झाले. यात प्रचंड जीवितहानी झाली. ऑगस्टच्या अखेरीस इसिसने काबुल विमानतळावर बॉम्बस्फोट घडवला होता, ज्यामध्ये अनेक लोक मारले गेले होते.

    काबुल : अफगाणिस्तानात तालिबान आणि इसिसमध्ये जोरदार चमकक उडाली(Clashes between Taliban and ISIS). अफगाणिस्तानच्या उत्तर परवान प्रांताची राजधानी छारीकारमध्ये तालिबान आणि इसिस यांच्यात झालेल्या चकमकीत किमान 20 तालिबानी ठार झाल्याची माहिती आहे. तालिबान आणि इसिसच्या दहशतवाद्यांमध्ये गोळीबार आणि बॉम्ब हल्ले झाले. यात प्रचंड जीवितहानी झाली. ऑगस्टच्या अखेरीस इसिसने काबुल विमानतळावर बॉम्बस्फोट घडवला होता, ज्यामध्ये अनेक लोक मारले गेले होते.

    या चकमकीदरम्यान तालिबानने इसिसचा एक अड्डा नष्ट केला. प्राप्त माहितीनुसार, तालिबान सैनिकांनी छारीकर शहरातील काल ख्वाजा येथील एका घराला लक्ष्य करत गोळीबार केला, त्या दरम्यान दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारामध्ये किमान नऊ तालिबानी ठार झाले आणि एका महिलेसह तीन नागरिकांचाही मृत्यू झाला. दुसऱ्या हल्ल्यात इसिसच्या अतिरेक्यांनी तालिबानच्या वाहनावर बॉम्ब फेकला ज्यामध्ये किमान तीन तालिबानी ठार झाले.

    ‘आत्मघाती बॉम्बर्स’ तैनात करणार

    तालिबानने आत्मघाती बॉम्बर्सची एक विशेष बटालियन तयार केली आहे. ही बटालियन अफगाणिस्तानच्या सीमेवर, विशेषत: बदाखशान प्रांतात तैनात केली जाईल. बदाखशान प्रांताचे डेप्युटी गव्हर्नर मुल्ला निसार अहमद अहमदी यांनी माध्यमांना बदाखशानच्या ईशान्य प्रांतात आत्मघाती बॉम्बर्सची एक बटालियन तयार करण्याविषयी माहिती दिली. या प्रांताची सीमा ताजिकिस्तान आणि चीनशी लागून आहे. अहमदी म्हणाले की, या बटालियनचे नाव ‘लष्कर-ए-मन्सुरी’ आहे आणि ते देशाच्या सीमेवर तैनात केले जातील.

    अहमदी पुढे म्हणाले, ही बटालियन नसती तर अमेरिकेचा पराभव शक्य झाल नसते. हे शूर सेनानी स्फोटकं परिधान करून अफगाणिस्तानातील अमेरिकेची ठिकाणे उडवतील. या बटालियनमधील सैनिकांना आपल्या जीवाची भीती नाही, त्यांनी स्वतःला अल्लाला समर्पित केले आहे. तालिबानने लष्कर-ए-मन्सुरीसह बद्री 313 बटालिनचीही स्थापना केली आहे. हा सर्वात सुसज्ज आणि आधुनिक लष्करी गट म्हणून ओळखला जातो. ही बटालियन काबूल विमानतळावर तैनात आहे.