corona spread from dogs

नवा कोरोना विषाणू (New Strain of Corona)कुत्र्यांच्या माध्यमातून माणसांमध्ये विशेषत: मुलांमध्ये(Corona Spread from dogs to children) संक्रमित होऊ शकतो.कुत्र्यांमधून पसरणारा हा पहिलाच कोरोना विषाणू आहे.

    कोरोनामुळे(Corona) सगळं जग चिंतेत आहे. कोरोना व्हायरसचे आत्तापर्यंत ७ नवे प्रकार समोर आले आहेत. आता कोरोनाचा आठवा प्रकारही(8th Strain of Corona) समोर आला आहे. हा प्रकार अधिक घातक आहे. कारण या प्रकारात प्राण्यांच्या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण होत असल्याचे पुरावे मिळाले आहेत.हा नवा कोरोना विषाणू कुत्र्यांच्या माध्यमातून माणसांमध्ये विशेषत: मुलांमध्ये संक्रमित होऊ शकतो.कुत्र्यांमधून पसरणारा हा पहिलाच कोरोना विषाणू आहे.

    संशोधकांनी नव्या व्हायरसला CCoV-HuPn-2018 असं नाव दिलं आहे. मलेशियामध्ये याचे ८ रुग्ण सापडले ज्यात ७ मुलांचा समावेश आहे. एका मुलाला न्युमोनिया झाला पण तो बरा झाला आहे. या मुलांना ४-६ दिवसांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला.हा विषाणू किती घातक आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही.नव्या कोरोना स्ट्रेनमुळे काय होऊ शकते यावर संशोधन सुरु आहे. आत्तापर्यंत जितके लोक या विषाणूमुळे संक्रमित झाले आहेत ते सगळे बरे झाले आहेत.

    ओहियो युनिव्हर्सिटीचे डॉक्टर अनास्तासिया व्लासोवा यांनी सांगितलं की, आम्ही अजून हा विषाणू किती गंभीर आहे यावर संशोधन करत आहोत. तसेच नॉर्थ कॅरोलिनाच्या ड्यूक युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आणि स्टडी रिपोर्टचे प्रोजेक्ट लिडर प्रो ग्रेगरी ग्रे यांनी सांगितलं की, हा विषाणू धोकादायक आहे. प्राण्यांमधून हा माणसांमध्ये पसरत आहे.यावर अजूनही कोणता उपाय नाही.

    अनेक तज्ञांनी कुत्र्यांमुळे कोरोनाचा प्रसार होतो, हा दावा फेटाळला आहे. कुत्र्यांमुळे कोरोना पसरतो हा केवळ अंदाज असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.