दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांमध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट, लसीकरणानंतरही संसर्गाचा धोका

दक्षिण आफ्रिका(South Africa) आणि अन्य काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट(New Variant Of Corona Found In South Africa) आढळून आला आहे.

    दक्षिण आफ्रिका(South Africa) आणि अन्य काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट(New Variant Of Corona Found In South Africa) आढळून आला आहे. हा विषाणू वेगाने पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. लसीकरणानंतरही या व्हेरिएंटचा संसर्गाचा धोका असल्याने चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकबल डिजीस (एनआयसीडी) आणि क्वाझुलु नेटाल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेन्सिंग प्लॅटफॉर्मच्या शास्त्रज्ञांना पहिल्यांदा या विषाणूची माहिती मिळाली होती. या विषाणूच्या व्हेरिएंटला C.१.२ असं नाव दिलं गेलं. दक्षिण आफ्रिकेत नव्या व्हेरिएंटने प्रभावित लोकांची संख्या वाढत आहे.

    कोरोनाचा नवा व्हेरिएंट C.१.२ हा चीन, कांगो, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल, स्वित्झर्लंडमध्ये १३ ऑगस्टपर्यंत आढळून आला आहे. २४ ऑगस्टला प्रीप्रिंट रिपोजिटरी MediRxiv वर एक अहवाल जारी करण्यात आला होता. त्यात C.१.२ हा व्हेरिएंट C.२ च्या तुलनेत अधिक घातक असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नव्या व्हेरिएंटबाबत चिंता वाढली आहे.