भारतीय विमानांना कॅनडात ‘नो एंट्री’; 21 ऑगस्टपर्यंत निर्बंध

    ओटावा : कॅनडात वास्तव्य करणाऱ्या भारतीय नागरिकांना जबर झटका बसला आहे. कॅनडाने भारतातून देशात येणारी विमाने 21 ऑगस्टपर्यंत निलंबित केली आहेत. कोरोना विषाणूचा धोका पाहू जाता कॅनडा सरकारने हा निर्णय घेतला. दरम्यान, कोरोनाचा धोका पाहू जाता पुढील नोटीसर्पंत देशाबाहेर प्रवास न करण्याचे आवाहनदेखील सरकारने नागरिकांना केले आहे.

    यापूर्वीही कॅनडा सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारत व पाकिस्तानच्या विमानांना बंदी घातली होती. आता त्यात सतत वाढ केली जात आहे. केवळ आवश्यक वस्तू, ज्यात वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे त्याच मालवाहू विमानांना देशात परवानगी देण्यात आली आहे.

    भारतातून कोणत्याही तिसऱ्या देशाच्या माध्यमातून कॅनडाला जाणाऱ्या नागरिकांना तिसऱ्या देशात कोरोना चाचणी करावी लागेल. चाचणी निगेटिव्ह असेल तरच कॅनडात प्रवेशाची परवानगी देण्यात येईल.

    जर प्रवास करणारे व्यक्ती पूर्वी कोरोनाबाधित झाले असतील तर त्यांना प्रवासापूर्वी 14 ते 90 दिवसपूर्वी चाचणी करून घ्यावी लागेल. व ती सुद्धा तिसऱ्या देशातच करावी लागेल.